येवला तालुक्यातील वीज वितरण कंपनी येथील उपकेंद्रात प्रवेश करून चोरी करणारे हेच ते दोन भोंदू साधू सविस्तर वृत्त
दोघा भोंदू साधूंनी भुरळ पाडत सब स्टेशन ऑपरेटर ला लुटले
न्यायभूमी
येवला दि.०८ डिसेंबर
कारमधून प्रवास करणाऱ्या दोघा बोगस साधूनी संधीसाधूपणा करीत हातचलाखीने चिचोंडी बुद्रुक (ता.येवला) येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी एकटे असल्याचे पाहून त्यांना भुरळ पाडत त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि हातातील चांदीचे कडे घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून,दोघा भोंदूंचा शोध सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी दि.६ दुपारी बारा वाजेच्यादरम्यान चिचोंडी बुद्रुक येथील विद्युत उपकेंद्राबाहेर एक स्वीफ्ट डिझायर कार येऊन थांबली.
त्यातील मागील सीटवर बसलेल्या दोघा साधूंनी खाली उतरून सबस्टेशनच्या कार्यालयात प्रवेश केला.
तेथील कर्मचारी राजेश ढोले यांना’तुम्ही एकटेच आहात का ? अजून कोण आहे जोडीला’असा प्रश्न केला.ढोले यांनी आपण एकटेच असल्याचे सांगितले.
त्यावेळी एक भगवे कपडे घातलेला आणि दाढी वाढवलेला एक साधू व दुसरा काळे कपडे अंगावर असलेला व पांढरी दाढी असलेल्या साधूने त्यांच्याशी बोलताना त्यांना भुरळ घातली.
काही क्षणातच त्यांनी ढोले यांच्याकडील पैसे,हातातील चांदीचे कडे घेऊन त्यांनी पोबारा केला.
आपण लुबाडले गेल्याचे लक्षात आल्या नंतर राजेश ढोले यांनी येवला शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून,हवालदार व्यापारे पुढील तपास करीत आहेत.