Breaking
महाराष्ट्र

बाभूळगावात घंटागाडी दाखल ! ‘न्यायभूमी’च्या संपादकांनी उचललेला प्रश्न लागला मार्गी

न्यायभूमी न्यूज मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

​न्यायभूमी

 नासिक ( येवला ) दि.२५ जानेवारी सुनील क्षिरसागर

 

Oplus_131072

येथील बाभुळगाव (खु./बु.) परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर झाली होती.कचरा टाकण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.

या समस्येला’न्यायभूमी’ ने आपल्या बातमीतून वाचा फोडली होती.विशेष म्हणजे ‘न्यायभूमी’चे संपादक अभय बाळासाहेब पाटील यांनी ग्रामपंचायतीचा हा प्रश्न गांभीर्याने उचलून धरला आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा घंटागाडीचा प्रश्न मार्गी लावला.

 

Oplus_131072

या बातमीची,संपादकांच्या पाठपुराव्याची आणि नागरिकांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत ग्रामपंचायतीने गावात घंटागाडी सेवा सुरू केली आहे.

​बाभुळगाव येथील म्हसोबा नगर आणि परिसरातील रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती.

या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय,सरपंच, उपसरपंच,सदस्य तसेच ग्रामसेवक यांना निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला होता.

प्रसिद्ध झालेल्या बातमीचा परिणाम आणि संपादकांचा पाठपुरावा यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित हालचाल करत घंटागाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

​ही सेवा सुरू झाल्यामुळे बाभुळगाव म्हसोबा नगर येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

“यापुढेही अशीच तत्पर सेवा मिळावी,”अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

​या तत्पर कार्यवाहीबद्दल सरपंच रमा गायकवाड, उपसरपंच सुनिता गायकवाड,सदस्य – शरद बोरनारे,रविंद्र बोरनारे,मिना वाबळे,वैशाली वाबळे,कविता सोनवणे,संजय गादीकर,बापु भालेराव,रेखा बनसोडे, बाबुराव आहीरे,तसेच ग्रामसेवक प्रवीण पठारे,कर्मचारी रवी गायकवाड यांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे