घोटी येथील जनता विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सिन्नर दि.२५ जानेवारी प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी )

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित घोटी येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक ॲड.संदीप भाऊ गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने विद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन व भव्य ग्रंथदिंडी पारंपारिक आणि उत्साही वातावरणात गावातून आयोजित करण्यात आली.
व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष मनोजभाऊ जाधव, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव,शालेय समितीचे सदस्य नरेंद्र मेधने,दिपा कंदकुरीवार,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ गव्हाणे ,दत्तात्रय भोर,विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे,उपमुख्याध्यापक उल्हास पवार,पर्यवेक्षक हिरामण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आकर्षक सजवलेल्या पालखीत भगवदगीता व इतर ग्रंथ ठेवण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथपूजनाने झाली.उपस्थित मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून ग्रंथांचा आस्वाद घेतला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सजून साहित्यिकांचे ग्रंथ,घोषवाक्यांचे फलक हातात घेत परिसरात वाचनाची सवय लावणे ही नव्या पिढीची महत्त्वपूर्ण जबाबदारी असून पुस्तक आणि भाषा हेच खरे ज्ञानाचे दीपस्तंभ असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती प्राचार्य नितीन भामरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
प्राचार्य नितीन भामरे म्हणाले की, मराठी भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची,परंपरेची आणि ओळखीची मानबिंदू आहे.मराठी भाषेबद्दल अभिमान जागवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवणे हा या पंधरवड्याचा मुख्य हेतू असल्याचे प्राचार्य भामरे यांनी स्पष्ट केले.
पंधरवडानिमित्ताने वाचनप्रेरणा उपक्रम,कविता वाचन,निबंधलेखन,शब्दसंपदा वाढवा अभियान,वाचनदिंडी,कथाकथन, सामान्यज्ञान स्पर्धा,वकृत्व स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्याध्यापक उल्हास पवार यांनी मराठी ही आपली मायबोली,संस्कृतीची शान आणि अभिमान असल्याचे सांगितले.पर्यवेक्षक हिरामण चौधरी यांनी शुद्ध मराठीत बोलणे, लिहिणे ही आपली जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा इतिहास,वैशिष्ट्ये आणि आजच्या काळातील महत्व याबाबत मनोगत व्यक्त केले.
कवी मुकुंद ताकाटे, कवी प्रशांत केंदळे,व्याख्याते सोमनाथ मत्ससागर यांनी विविध कविता सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले.आई विषयी व इतर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल प्रेम,आदर आणि संवर्धनाची भावना वृद्धिंगत होण्यासाठी मदत होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.


