Breaking
आरोग्य व शिक्षण

शाळेच्या दुरावस्थेबद्दल आमदार राहुल आहेर यांना ग्रामस्थांचे निवेदन 

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 3 8 9 3

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र

चांदवड दि.२३ मे सहसंपादक सुनील पोळ 

      चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची झालेली दुरवस्था ही भयावह असून 1 ते 7 वर्ग असलेली जि.प.शाळा वाकी बु.गेल्या अनेक वर्षापासुन वर्ग खोल्यांची दुरावस्था झालेली असून त्या मोडकळीस आलेल्या आहेत.

पावसाळ्यात सर्व खोल्या गळतात तसेच खोल्यांमधुन संथ गतीने पाणी वाहते.सर्व खोल्यांना तडे गेले असून येणाऱ्या पावसाळ्यात कुठलीही दर्घटना होऊ शकते. सदर वर्ग खोल्या मंजुर होणेकामी जि.प.शाळा मुख्याध्यापक व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी आपल्याकडे पाठपुरावा केलेला आहे.

मागील काही वर्षापूर्वी ४ खोल्यांचे निर्लेखन झालेले असुन त्यांचेही आजपावेतो बांधकाम सुर झालेले नाहीः

तसेच सदर जि.प.शाळा,वाकी बु.शाळेला सन २०२४ मध्ये वॉलकंपाऊड बांधकाम करणेकामी निधी मंजुर झालेला असुन सदर वॉलकंपाऊड चे उदघाटन झाले. परंतु त्याचे बांधकाम अजुन सरू झालेले नाही.

सदर जि.प.शाळेच्या वर्गखोल्यांची खुप दयनीय अवस्था झालेली असुन सदर खोल्यांचे नवीन बांधकाम होणे गरजेचे आहे.

 जवळपास शाळेची पटसख्या ही १५० च्या आसपास असून जर वर्ग खोल्या मंजूर होऊन त्याचे बाधकाम झाले नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात मोठी दुर्घटना होऊ शकते व ते विद्यर्थ्याच्या धोक्याचे असून सदर शाळेत स्वच्छतेचा अभाव,पिण्याच्या पाण्याची तिव्र समस्या आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे परीसरातील विद्यार्थ्यांना रोज नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

तसेच सदर जि.प.शाळेच्या आवारात वॉल कंपाऊड नसल्याने परीसरात रात्रीच्या वेळेस नशा करणारे लोक दारूच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

दररोज सकाळी लहान मुले व शिक्षक त्या दारूच्या बाटल्या व झालेली अस्वच्छता रोज साफ करतात त्यामळे सुरक्षेच्या दष्टीने सदर शाळेला मंजूर झालेले वॉल कंपाऊड चे बांधकामही त्वरीत सरू होणे गरजेचे आहे.

या विषयांचे निवेदन आमदार डॉ राहुल आहेर यांना शालेय व्यवस्थापनसमितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यामार्फत देण्यात आले.

Oplus_131072
5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 3 8 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे