Breaking
राजकिय

भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांची ‘पीएम विश्वकर्मा’शासकीय समितीवर निवड

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

नासिक ( विचूर ) दि.२४ जानेवारी सुनील क्षिरसागर

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या शासकीय समितीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. शंकरराव वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्यम (MSME) मंत्रालयाच्या पीएम विश्वकर्मा विभाग विकास कार्यालयातून ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

एका सामान्य कार्यकर्त्याला थेट केंद्रीय समितीवर संधी मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वाघ यांचे कौतुक होत आहे.

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी गठीत करण्यात आलेल्या या समितीवर वाघ यांची नियुक्ती झाली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल भाजपचे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा अध्यक्ष खा.के.लक्ष्मण,राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,ग्रामविकास मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

​यांनी केले अभिनंदन:

शंकरराव वाघ यांच्या निवडीचे वृत्त समजताच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यामध्ये प्रामुख्याने भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, किशोर काळकर,आ.देवयानी फरांदे, आ.सीमाताई हिरे,आ.डॉ.राहुल आहेर,आ.राहुल ढिकले,आ.दिलीप बोरसे,आ.सुहास कांदे,आ. नितीनजी पवार,माजी आ.बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी,विजय साने,सुनील केदार, यतीन कदम यांचा समावेश आहे.

​तसेच सुनील बच्छाव,निलेश कचवे,दादा जाधव, प्रशांत जाधव,सुरेश आण्णा पाटील,सुनील खोडे,पप्पू माने,केशवराव सुरवाडे, आनंद शिंदे,सतीश मोरे,भागवत बाबा बोरस्ते,संदीप नागरे, संतोष सोनवणे, योगेश चौधरी,परेश शहा,अक्षय जोशी,ॲड.वाल्मीक राव गायकवाड, राजू राणा,छोटू काका पानगव्हाणे,नवनाथ जाधव,अशोक निफाडे,राजेंद्र चाफेकर,रमेश अण्णा घुगे,गणेश धात्रक,डॉ.अभय निकम,एस. के.पगार सर,भूषण कासलीवाल,कैलास शिंदे, विजय साळवे, शंकर मोरे,विनायक खालकर, जगन आप्पा कुटे,पंढरीनाथ पीठे,रवींद्र बागडे, गोरख कर्वे,भरत बोरगुडे, किसन आहेर, बाळासाहेब कर्डिले, दिनकर खालकर,योगेश कांदळकर,योगेश कुंदे,वसंत कापसे,पुंजाराम कडलक,तय्यब शेख, संदीप शिरसाट,दिलीप मंडलिक,मयूर गावडे,आकाश मोरे,गौरव व्यवहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाघ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे