नाशिक मधील मालेगाव स्टॅन्ड चौकीचे पोलिस हवालदार श्री सचिन आहिरे यांची मदत सविस्तर वाचा
अकस्मित मृत्यू पावलेल्या व्यक्तीना स्व खर्चातून हॉस्पिटल मध्ये उपचारा करता दाखल
न्यायभूमी न्यूज
नासिक दि ०९ एप्रिल विशेष प्रतिनिधी रोशन गव्हाणे

पोलीस म्हटले की कुठल्याही नागरिकाच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर निघते ते म्हणजे पोलिसांशी मितीही नको आणि दुश्मनीही नको तर पोलीस कोनालाही होत नाही.
आपल्याला काय होणार अशी एक दृढ भावना समाजाप्रती काही अ कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे समाजामध्ये निर्माण झाली परंतु या सर्व गोष्टींना चुकीचे ठरवत लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नाशिक मधील मालेगाव स्टॅन्ड चौकीचे पोलिस हवालदार श्री सचिन आहिरे यांनी पंचवटी येथील मालेगाव स्टँड परिसरात आत्महत्या करणाऱ्या कितेक तरुण-तरुनी चे जीव सचिन आहिरे यांनी वाचवले असून कित्येक जीव वाचवले असून त्यांच्या परिवाराचे स्वाधीन केलेले आहे.
तसेच परिसरात अथवा महामार्गांवर अपघात होऊन मृत पावलेल्याना व जखमीना दवाखान्यात पोहोचले असून किंवा अकस्मित मृत्यू पावलेल्या व्यक्तीना स्वखर्चातून हॉस्पिटल मध्ये उपचारा करता दाखल केले आहे.
त्यांच्या अशा कार्याबद्दल मालेगाव स्टँड वरील लोकांकडून कौतुक केले जात आहे.
कोणाच्याही मदतीला ते सदैव तत्पर असतात यांच्या कार्याला मालेगाव स्टँडवरील हद्दीतील नागरिकांकच्या समस्या सोडवल्या असून त्यांनी गोरगरिबाला न्याय देण्यापासून अत्यंत मोलाचे काम,त्यांनी वेळोवेळी आपल्याकडून मदत केली आहे.

पोलीस हवालदार सचिन आहिरे करीत आहे.
न्यायभूमी न्यूज परिवार तर्फे त्यांच्या कार्याला सलाम