Breaking
महाराष्ट्र

विंचूर जवळ भीषण अपघात छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 2 7 9 1

न्यायभूमी 

 लासलगाव दि.३० जुलै प्रतिनिधी कैलास उपाध्ये

निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात छोटा हत्ती वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला,तर वाहनातील कांदा मालक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पिंपळस – येवला राज्य महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे निर्माण झालेल्या एकेरी वाहतुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकद येथील एम.एच ४३ बी.बी ०३१० क्रमांकाचा छोटा हत्ती कांदा विक्रीसाठी विंचूर येथील माऊली वजन काटा व पेट्रोल पंपाजवळून जात असताना समोरून येणाऱ्या छत्तीसगड येथील सी.जी २९ ए.जी ५४७३ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या १६ टायर ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात छोटा हत्तीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की,छोटा हत्ती सुमारे दहा फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातात या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात छोटा हत्ती चालक ज्ञानेश्वर दगडू शिंदे,रा.वाकद यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी बसलेले कांदा मालक शरद विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमीला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

  पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब कांदळकर करीत आहेत.

    सध्या पिंपळस – येवला राज्य महामार्गाचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने विंचूर परिसरात अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.

अरुंद मार्ग,मोठ्या वाहनांची वाढती वर्दळ आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रकारांमुळे या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या मार्गावर तातडीने प्रभावी वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

3.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 7 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे