कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांचे सर्वच क्षेत्रातील कार्याचा उल्लेखनीय- मुख्याध्यापक उगले
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि ०५ एप्रिल प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी)
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे भूतपूर्व सरचिटणीस कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार,जेष्ठ शिक्षक पी.आर. करपे,सोमनाथ पगार , कचेश्वर शिंदे, अलका काळोगे,विद्या ठाकरे,रेखा खंडीझोड,रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते डॉ.पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
धर्मराज वाजे,पियुष पडवळ ,खुशी गोफणे या विद्यार्थ्यांसह उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी डॉ. पवार यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ उगले म्हणाले की,डॉ. पवार यांनी शिस्त ,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर मविप्र संस्थेचा कारभार केला.
संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विस्तारासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. डॉ. पवार यांचे मविप्र संस्थेसाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही.
डॉ.पवार यांचे सामाजिक,सहकार,राजकीय,शैक्षणिक,वैद्यकीय, साहित्य आदिंसह विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.
मुख्याध्यापक उगले म्हणाले. इयत्ता आठवी तुकडी अ च्या वर्गशिक्षिका सीमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रम संपन्न केला.
सूत्रसंचालन गौरी वाजे,समीक्षा वारुंगसे,तनुजा वाजे यांनी तर आभार आरोही जाधव हिने मानले.
यावेळी डी. ए.रबडे,रेवणनाथ कांगणे,उत्तम कामडी,वृषाली घुमरे, सोमनाथ माळी,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत,रवि गोजरे,किशोर ,शिंदे आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीउपस्थित होते.