ताहाराबाद विद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
ताहाराबाद दि ०९ मार्च
ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद विद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य डी.ए.डावरे यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य डी. ए. डावरे,उपमुख्याध्यापिका श्रीमती आर.आर. सोनवणे ,प्रभारी पर्यवेक्षक श्री.एस. के. निकम यांच्या हस्ते राष्ट्रमातांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील काही विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर आदी राष्ट्रमातांची वेशभूषा परिधान केलेली होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका श्रीमती सीमा पवार यांनी केले.
वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिव्या नंदन, जान्हवी शिरसाठ,काव्या भामरे, समृद्धी झाल्टे, करुणा गांगुर्डे, गायत्री साळवे, प्रांजल पाटील आदी विद्यार्थिनींनी तसेच शिक्षक भाषणातून उपशिक्षक श्री. के. जी. अहिरे व जितेंद्र बच्छाव यांनी आपल्या भाषणातून जगाच्या विकासात योगदान दिलेल्या महिलांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी आपल्या भाषणातून प्राचार्य डावरे यांनी कोणत्याही देशाची प्रगती ही महिलांवर अवलंबून असून सर्व महिलांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या वेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातर्फे विद्यालयातील सर्व महिलांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रेयसी विसपुते व आरती शर्मा यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार उपशिक्षक सुजित देवरे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे उपशिक्षक जे. एल. गावित,के.जी.अहिरे, के. एम. मोरे, के. ए.बागुल, एस.बी.सोनवणे, श्रीमती पी.पी. माटे,जे.पी. बच्छाव, के.बी. चव्हाण, आर. जी.संसारे, श्रीमती एस. बी.रौंदळ, एस.आर. दळवी, श्रीमती डी.आर. गावित, एस.जी. गिरी, एस. ए. पवार, एस. यू. भामरे,एस.पी.देवरे, आर. डी. पगार, श्रीमती एस.व्ही. सूर्यवंशी, डी. एल. कापडणीस,जयदीप मोरे,डी.व्ही. सोनवणे, एल.यु.साळवे, वाय. व्ही. पवार तसेच सुनील देवरे, सखाराम अहिरे, निलेश माळी,कुणाल देवरे, धनंजय वणीस,मंगेश पगारे, प्रवीण रौदळ मामा उपस्थित होते.

