Breaking
आरोग्य व शिक्षण

लासलगाव येथे १०२ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; दायमा सेवाभावी मंडळाचा स्तुत्य उपक्रम

1 0 9 0 3 9

न्यायभूमी 

लासलगाव दि.२१ जुलै महेश साळुंके

येथील ‘मातोश्री हरकुबाई मोतीलालजी दायमा विविध सेवाभावी मंडळ,लासलगाव’ या ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

ट्रस्टतर्फे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा या दोन्ही शाळांमधील एकूण १०२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

​विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.योगेशजी चांदक हे होते.

त्यांच्याच शुभहस्ते विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या वह्या,कंपास पेटी,अंकलिपी,छत्री आणि वॉटर बॅग इत्यादी आवश्यक वस्तूंचे संच देण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

​भविष्यात वाचनालय उभारणार: प्रकाश दायमा

ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दायमा यांनी या प्रसंगी बोलताना संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या बौद्धिक विकासासाठी भविष्यात ट्रस्टच्या वतीने लासलगाव येथे एका सुसज्ज वाचनालयाची (लाइब्ररी) उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लासलगावचे माजी सरपंच अफजल शेख, ग्रामपंचायत प्रशासक सौ.योगीताताई पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे, श्री.योगेश पाटील,लतीफभाई शेख, बिस्मील्लाहभाई शहा, डॉ. प्रियंका गायकवाड, डॉ. प्रणव माठा, डॉ. स्वप्नील जैन, डॉ. युवराज पाटील आणि डॉ. संगीता सुर्से आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे विश्वस्त मदनलाल दायमा,प्रा.कैलास दायमा,श्री.अशोक दायमा,शुभम दायमा,सचिव सुदीन टले,जितेंद्र चोधानी,ओमप्रकाश व्यास, जगदीश कलंत्री, सचिन शिंदे,दिपक परदेशी आणि सतीश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख श्री.सुभाष चव्हाण,शिक्षिका प्रतिभा शार्दुल आणि शिक्षक मनियार अब्दुल जब्बार उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष डागा यांनी केले,तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ. श्रीनिवास दायमा यांनी मानले.

या उपक्रमामुळे लासलगाव परिसरात दायमा सेवाभावी मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 0 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे