Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे येथील जनता विद्यालयात सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

 सिन्नर दि ०२ में  प्रतिनिधी सोमनाथ गिरी

डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते.

निवृत्त मेजर केशव ढोली यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने,सरपंच रामनाथ पावसे, बबनराव वाजे, काशिनाथ वाजे,माजी सरपंच अर्जुन वाजे ,शरद माळी,सविता वारुंगसे,दामोदर कुंदे पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव वामने ,अनिल वारुंगसे, वसंतराव जाधव,पत्रकार सुनिल जाधव,गणेश वाजे,पोलीस पाटील रामदास वारुंगसे,प्राचार्य रंगनाथ उगले , पर्यवेक्षक उल्हास पवार आदी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाराष्ट्र दिन व कामगार दिन का साजरा करतात? याविषयी सविस्तर माहिती दिली. माजी सरपंच अर्जुन वाजे यांच्या वाढदिवस विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला. 

        पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेला विद्यार्थी प्रेम ढोली तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या गौरी वाजे व आरोही जाधव तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांना वार्षिक गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन पी.आर. करपे यांनी तर आभार पर्यवेक्षक पवार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीसोमनाथ पगार, सोमनाथ गिरी,डी.ए. रबडे, सुनिल ससाणे,शिवाजी गुरुळे,रेवणनाथ कांगणे,जयश्री गोहाड,रवि गोजरे, किशोर शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतले.

यावेळी शालेय समितीचे सदस्य, ग्रामस्थ, विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे