Breaking
आरोग्य व शिक्षण

उपक्रमाशील विज्ञान शिक्षक पी.आर.करपे यांना फिलोशिप मिळाल्याबद्दल सत्कार

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि २२ जुलै प्रतिनिधी सोमनाथ गिरी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने देण्यात येणारी त्रिरश्मी शिक्षक फिलोशिप पुरस्कारासाठी डुबेरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक पी.आर.करपे यांना जाहीर झाली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात केलेले उत्कृष्ट योगदान,त्यांनी जिल्ह्यात प्रथमच इस्रो या ठिकाणी विद्यार्थ्यांची वैज्ञानिक सहल आयोजित केली,आयसर पुणे येथे ५० विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक उपक्रमासाठी भेट घडून आली.

टीआयफआर मुंबई या ठिकाणीही विज्ञानामध्ये रुची असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आणली होती.विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून निधी मिळून दरवर्षी ६० ते ७० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व इतर साहित्य पुरवण्याचे कामही त्यांनी केले.

विज्ञान प्रदर्शनामध्ये आत्तापर्यंत तालुकास्तरीय ते देशपातळीपर्यंत अनेक बक्षीस मिळवली, वैज्ञानिक हस्तलिखित,वैज्ञानिक लेख असे राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दाखवलेली समर्पित भावना या बाबी विचारात घेऊन करपे यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना रुपये २५ हजारची रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह मिळणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे होते.व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने,श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे,भाऊ रखमा वारुंगसे,विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक उल्हास पवार आदीं मान्यवर उपस्थित होते.

करपे यांना फेलोशिप जाहीर झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.उपस्थित सर्वच मान्यवरांनी त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल ससाणे यांनी केले तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले.


त्यांना ही फेलोशिप मिळाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे,तालुका संचालक कृष्णाजी भगत,संस्था माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके,माजी विद्यार्थी संघटना संचालक डॉ.धनंजय चव्हाण,विलास शिंदे आदिंसह विविध मान्यवर, शिक्षक,शिक्षकेतर सेवक वृंद, विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे