कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा :- मुख्याध्यापक उगले
डुबेरे जनता विद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांना अभिवादन

न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १३ मार्च प्रतिनिधी सोमनाथ गिरी
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक दिगंबर जाधव, सोमनाथ पगार,पी.आर.करपे,विद्या ठाकरे ,कचेश्वर शिंदे,सुनील ससाने,डी.ए. रबडे, पोलीस पाटील रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या वतीने पल्लवी गवळी हीने कर्मवीर थोरात यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक रंगनाथ उगले म्हणाले की, कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाची गंगा तळागळापर्यत पोचविण्याचे भरीव कार्य केले. मविप्र संस्था हेच आपले कुटुंब म्हणून समाजाची व संस्थेची सेवा केली.त्यांनी संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासावर भर दिला.
बहुजन हिताय- बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य अंगीकारून त्यांनी बहुजन समाजाची सेवा केली. त्यांचे शैक्षणिक कार्य अवर्णनीय आहे म्हणून त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा असे आव्हान श्री.उगले यांनी केले.
इयत्ता नववी तु- ब चे वर्गशिक्षक रेवणनाथ कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. सूत्रसंचालन धनश्री वामने, संस्कृती वारुंगसे, दीपिका बिन्नर यांनी केले तर आभार श्रावणी माळी हीने मानले.
यावेळी राजेंद्र गांगुर्डे,जयश्री गोहाड,सीमा गोसावी, राणी शिंदे, रोहिणी भगत,किशोर शिंदे,रवि गोजरे,ज्ञानेश्वर कडभाने,संकेत जाधव आदींसह सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.