ज्ञानाचा दीप उजळणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा गौरव
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
निफाड दि ०९ मार्च अभय पाटील

ज्ञानाचा दीप उजळणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा गौरव असतो.
शिक्षक क्षमता वाढ प्रशिक्षण 2.0 या उपक्रमात आपल्या शैक्षणिक कार्याने ठसा उमटवणाऱ्या सुलभकांचा एक आगळावेगळा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात आदरणीय लता भरसट यांनी आपल्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गुणवंत सुलभकांचा सन्मान केला.
ज्ञानरूपी अमृताची मुक्त उधळण करणाऱ्या आणि शिक्षणक्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या सुलभकांनी या प्रशिक्षणात चारही टप्प्यांत आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. त्यांच्या अथक परिश्रमांची दखल घेत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात श्री. रमेश गुरगुडे, श्रीम.बबीता गांगुर्डे,श्री. नरहरी वाघमारे, श्रीम. निलम निचित, श्री. पंकज गांगुर्डे, श्री. किरण शिंदे, श्री. प्रकाश नारद, श्रीम. मयुरी पंडीत, श्रीम. भूमी चौरे, श्रीम. सविता वैद्य, श्रीम. योगेश्वरी खैरणार, श्री. अविनाश सातपुते, श्री. देवेंद्र वाघ, श्रीम. कांचन बागुल, श्री. माणिक मुरकुटे, श्रीम. स्वाती ब्राह्मणकर, श्री. संदीप दाभाडे, श्री. निलेश निरभवणे, श्रीम. रुपाली कदम, श्रीम. भाग्यश्री खैरणार, श्री. अजय वानखेडे, श्री. रामप्रसाद चित्ते, श्री. आत्माराम न्याहारकर आणि श्री. विजय खालकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

