लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांमध्ये निवड
लासलगाव प्रतिनिधी कैलास उपाध्ये

न्यायभूमी दिनांक ०३ ऑक्टोंबर
लासलगाव
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यyमिक विद्यालयाचा गुणी विद्यार्थी साहिल शेख याने एकोणावीस वर्ष आतील वयोगटात किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची निवड विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. एनसीसी विभागांतर्गत पॉईंट टू टू 50 मीटर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सोहम भालेराव व विशाल खाडे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धा मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे संपन्न झाल्या. तसेच चिन्मय भूलेने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
प्रथमेश गांगुर्डे व वेदांत कदम हे दोन्ही विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र झाले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य अनिल सोनवणे व पर्यवेक्षिका विद्या कुलधरण यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा नीताताई पाटील,सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,खजिनदार अभय पाटील व सर्व संचालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत नेटारे,संदीप गंभीरे,प्रमोद पवार, सोनाली वाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
