पालखेड मीरचीचे येथे जि.शाळा.न्यू इंग्लिश स्कूल व वर्दळीच्या ठिकाणी गतीरोधक बसवा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दि.१६ जुलै विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील गजबजलेल्या बाजार पेठ. शहराच्या मध्यावर्ती भागात असलेल्या पालखेड मीरचीचे येथे जि.परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थी तसेच दिवसभरात शेकडो नागरिकांना कामा निमित्त रस्ता ओलांडून पुढे जावे लागते.
त्यातच शाळा व स्कूल सुटल्यानंतर घरी जातांना रहदारी रस्ता पिंपळगाव-लासलगांव रस्त्यावर व चौफुलीवर गतिरोध टाकावा अशी मागणी जिस. शाळा व न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक यांनी पिडब्लू डिला सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली आहे.
आज पर्यंत येथील रस्त्यावर स्पिड वेकर (गतिरोधक) टाकण्याचे काम झाले नाही. तरी संबंधित विभाग यांनी त्वरित दक्षाता घ्यावी अशी मागणी ग्राम पंचायत सरपंच सौ.अश्विनी शरद आहेर,उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ता श्री -गणेशभाऊ थेटे पाटिल,अनिल थेटे,गोविंद थेटे, पंढरीनाथ शिंदे व माजी -सरपंच भाऊसाहेब दादा थेटे,दत्तात्रेय थेटे,निर्भय महाराष्ट्र पार्टी चे श्री, कमलाकर बिडवे आणी जि. परिषद शाळा मुख्याध्यापक व न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक तसेच शाळेतील मुलांचे पालक यांनी केली आहे.
तसेच वरील मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको चा इशारा गावातील सामाजिक कार्यकर्ता व पालकांनी दिला आहे .



