Breaking
आरोग्य व शिक्षण

विंचूर मधील तीन युवकांची एक अनोखी सेवा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 7

न्यायभूमी न्यूज

विंचूर दि १७ जानेवारी

मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

संक्रांत म्हटली की पतंग ही आलीच पतंगी सोबत मांजाही आला परंतु पतंग उडवत असताना तुटलेल्या मांज्या मध्ये आकाशातील पक्षी तसेच जमिनीवरील वन्यजीव यांना सदैव इजा पोहोचवत असल्याचे आपणास आढळून येते या मांजा मुळे बऱ्याच पक्षांची पंख कापतात शरीराला ईज होते.

तसेच जमिनीवर विखुरलेल्या मांजा मुळे वन्यप्राणी हेही जखमी होतात त्या मुळे मांजा कोणताही असो नायलॉन असो की काचेचा म्हणजे त्याने प्राणी व पक्षांना इजा होतेच त्यात माणूस माणसाची सेवा करतो परंतु या प्राणी पक्षांना होणाऱ्या जखमांमुळे त्यांना आपला प्राणही गमावावा लागतो.

याची सेवा करण्याचा वसा घेतलेले विंचूर येथील व्हेटरनरी डॉक्टर राहुल गलांडे तसेच सर्पमित्र असिफ पटेल आणि रोहन संसारे यांनी बऱ्याच प्राणी व पक्षांचा जीव वाचून मान्जा व इतर त्रासा पासून त्यांची सुटका केली आहे.

अशातच आज दत्ता दिनकर शेलार विंचूर यांच्या घराजवळ मांजामध्ये अडकलेल्या green bee eater याचे मराठी नाव वेडा राघू या पक्षाची असिफ पटेल व सोहम संसारे यांनी मांजा मधून सुटका केली.

नंतर डॉक्टर राहुल गलांडे यांनी या पक्षाचा प्रथमोपचार करून त्याच जीवदान दिले या तीनही मित्रांना परिसरातील नागरिकांनी कौतुक केले

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे