न्यायभूमी न्यूज
पिंपळगाव बसवंत दि १० फेब्रुवारी प्रतिनिधी निखिल अहिरे
राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस पदे भरण्यासाठी मान्यता दिली असून, रिक्त पदे मार्च २०२५ अखेर पर्यंत भरली जाणार आहेत.
पात्र उमेदवारांनी या पदासाठी 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यलयीन वेळेत अर्ज करावेत असे आव्हान बाल विकास प्रकल्प अधिकारी स्वप्नाली संतोष कागदे यांनी केले आहे.
या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता बारावी उत्तीर्ण असावी मर्यादा १८ ते ३५ दरम्यान असून विधवांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असणार आहे.
उमेदवार त्याच महसुली गावातील रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी ०७ ते २१ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान कार्यालयीन दिवशी व वेळेत अर्ज करावेत.
भरती करावयाचे अंगणवाडी केंद्र याप्रमाणे अंगणवाडी सेविका या पदासाठी पालखेड-२,नांदूर खुर्द,सावरगाव-१, रानवड-१, रौळस-१, खेडे-१, मुखेड-१ तसेच अंगणवाडी मदतनीस या पदासाठी कारसूळ-३, नांदुर्डी-१, पालखेड-७, सावरगाव-३, कुंभारी-२, उगाव-५, शिवडी-१, खेडे-३, कोकणगाव-५, सिद्धार्थ नगर, नाफेड वस्ती-१/२, दत्त मंदिर, बेंद वस्ती-१, भाऊनगर, घोडके नगर वरील प्रमाणे अंगणवाडी सेविका ०७ रिक्त पदांसाठी भरती व १६ मदतनीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे.
पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत व प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आव्हान केले आहे.