Breaking
नोकरी

जवान ऐननाथ त्रंबक दौंडे यांची सेवापूर्ती निमित्त भव्य मिरवणूक

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज

येवला ( नाशिक ) दि ०३ फेब्रुवारी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत असे की, पिंपळगाव लेप येथील जवान भूमी पुत्र व सैन्य दलातील एसीपी हवालदार एकनाथ त्रंबक दौंडे 22 वर्ष सैन्य दलात भारत मातेची सेवा करून 31 जानेवारी २०२५ ला सेवानिवृत्त झाले जळगाव नेऊर पासून ते थेट पिंपळगाव लेपपर्यंत शुक्रवार दि. 31/1/2025 मिरवणूक काढण्यात आली.

ठिकठिकाणी घरासमोर रांगोळी काढण्यात आली व फुलांचा वर्षाव करून औक्षण करण्यात आले. आपल्या घरी आगमन होताच कुटुंबाने आनंद उत्सव साजरा करण्यात आला .

पत्नी व नातेवाईकांनी औक्षण केले ग्रामस्थ व मित्र परिवारातर्फे स्वागत करण्यात आले.

सेवापूर्ती सत्कार निमित्त गावात मिरवणूक काढण्यात आले सायंकाळी दौंडे वस्तीवर युवा व्याख्याते श्री महेश महाले यांचे व्याख्यान झाले.

त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण गव्हाणे यांनी अध्यक्षस्थान भूषविले निवृत्त जवान दौंडे यांच्या मातोश्री हौशाबाई दौंडे व पत्नी जयश्री दौंडे मुलगी तृप्ती दौंडे मुलगा वंश दौंडे शिवसेनाप्रमुख कुणाल दराडे येवला मार्केट कमिटी संचालक श्री सचिन आहेर येवला तालुका सैनिक ग्रुप रक्षक माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री सुशील शिंदे, श्री.बाबुराव सोनवणेश्री. रमेश तनपुरे श्री. बबन बटवल श्री .सुनील शिंदे लक्ष अकॅडमी चे संचालक श्री. आनंद गुंड श्री. किशोर राठोड शंकर ढोकळे श्री. अरुण शिरसाट श्री.अमोल शिंदे श्री .सोपान मढवई श्री.अशोक वाबळे श्री.विष्णू ढोणे श्री.प्रवीण महाजन श्री. रंभाजी दवंगे श्री.आनंद झाल्टे श्री विशाल बोरणारे आधी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्री. बापूसाहेब वाघ यांनी केले त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचे जावो निफाड तालुका राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भवर तसेच न्यायभूमी न्यूज, पोलीस टाईम्स 24/7 चे प्रतिनिधी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे