महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी बाळकृष्ण पंडितराव सांगळे यांची नियुक्ती
न्यायभूमी
नाशिक दि.२९ मे रोशन गव्हाणे
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या सोशल मीडिया प्रमुख पदी महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र सत्यगाव येथील भूमिपुत्र,प्रगतशील शेतकरी तथा युवा कार्यकर्ता श्री.बाळकृष्ण पंडितराव सांगळे यांची झालेली नियुक्ती ही संपूर्ण पंचक्रोशीसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरत आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दंडकारण्याच्या पवित्र भूमीत,पूर्वमुखी गंगा गोदावरी मातांच्या पावन कुशीत आणि उत्तर-दक्षिण वाहिनी असलेल्या पवित्र गोई नदीच्या नयनरम्य तीरावर वसलेले महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र सत्यगाव हे अध्यात्म,संस्कृती,संतपरंपरा आणि सामाजिक चेतनेचा दिव्य वारसा जपणारे पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
अडबंगीनाथांच्या तपोभूमी,जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या सानिध्यात वसलेली ही भूमी संत-महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.
महाराष्ट्रातील एकमेव महासती माता मंदिर आणि महासती मातेच्या कर्मभूमीने गौरवलेले हे क्षेत्र भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक संस्कारांचे प्रतीक मानले जाते.
संत बालयोगी महाराज,वामनभाऊ महाराज, संत जनार्दन स्वामी,तसेच महाराष्ट्रातील नामवंत संतपरंपरेचे अभ्यासक,प्रख्यात कीर्तनकार तथा रामायणाचार्य ह.भ.प.रामकृष्ण महाराज सानप सत्यगावकर यांच्या आध्यात्मिक वारशाने समृद्ध झालेल्या या भूमीतूनच श्री.बाळकृष्ण पंडितराव सांगळे यांसारखा अभ्यासू,संवेदनशील आणि शेतकरी प्रश्नांची जाण असलेला युवा नेता घडला आहे.
दुग्ध व्यवसायासह ऊस, कांदा व भाजीपाला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे,शेतीतील प्रत्येक घटकाचा सूक्ष्म अभ्यास असलेले प्रगतशील,अभ्यासू आणि दूरदृष्टीचे शेतकरी अशी श्री.बाळकृष्ण पंडितराव सांगळे यांची ओळख आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बियाणे,उत्पादन खर्च, मजुरी,औषध फवारणी,साठवणूक,बाजारभावातील चढ-उतार,निर्यात धोरण आणि शेती अर्थकारण यांचा सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे शासन दरबारी मांडणारे अभ्यासू शेतकरी नेतृत्व अशीही त्यांची ओळख आहे.
सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.
आधुनिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवत,लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारा हा युवा शेतकरी नेता आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
“गाव ते राज्य… राज्य ते देश…
शेतकऱ्यांच्या एकजुटीतच भारताच्या समृद्धीचा खरा संदेश
“मातीतून उगवलेला माणूस जेव्हा समाजासाठी झटतो, तेव्हा परिवर्तनाचा नवा इतिहास घडतो…”
“शेतकऱ्यांच्या घामाचा सुगंध जपणारा प्रत्येक हात हा राष्ट्राच्या विकासाचा खरा आधार असतो…”
“लेखणी आणि विचारांच्या बळावर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारा कार्यकर्ता समाजाचा खरा दीपस्तंभ ठरतो…”
अशा या पावन भूमीत घडलेल्या श्री.बाळकृष्ण पंडितराव सांगळे यांच्या भावी सामाजिक, शेतकरी आणि संघटनात्मक वाटचालीस संपूर्ण सत्यगाव ग्रामस्थ,पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी,शेतमजूर आणि तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


