Breaking
कृषीवार्ता

कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काँग्रेसचे निवेदन..

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 1 5 0 8

न्यायभूमी

लासलगाव दिनांक.२१ एप्रिल निशिकांत पानसरे 

नाशिक जिल्हा हा देशातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो लासलगाव परिसर हा आशियातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठापैकी एक असून बहुतांश शेतकरी बांधवांचा मुख्य उदरनिर्वाह कांदा पिकावर अवलंबून आहे.

सध्या कांदा पिकाला मिळणारे बाजारभाव हे उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

दिवसेंदिवस कांदा पिकाचा वाढता उत्पादन खर्च,मजुरी, बियाणे, खते, औषधे, वाहतूक साठवण या खर्चामध्ये मोठी वाढ झाली असल्याने याशिवाय नैसर्गिक आपत्तींना शेतकरी सामोरे जात असल्याने शेतकरी कर्जबाजारी आणि हवालदिल झाला आहे.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात किमान 500 रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान थेट जमा करण्यात यावे, नाफेड मार्फत कांदा खरेदी तात्काळ सुरू करून ती पूर्वीप्रमाणे थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघडलेला पद्धतीने करण्यात यावी.

कांदा खरेदीची प्रक्रिया ही पारदर्शक होण्यासाठी शेतकरी बचत गट आणि इतर माध्यमातून कांदा खरेदी न करता नाफेडणे थेट लिलावात उतरणे आवश्यक आहे तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल याबाबत केंद्र सरकारला पाठपुरावा करावा या व इतर अनेक मागण्यांसाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस,कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय दंडाधिकारी,तहसीलदार तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांना प्रत्यक्ष तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना मेलद्वारे सविस्तर निवेदन देण्यात आले.

सदर प्रसंगी सचिन होळकर यांच्यासोबत युवक काँग्रेसचे सचिन खडताळे,महेश शिरसाठ,निलेश चव्हाण, राजाबाबा होळकर,स्वप्निल बिनायकीया,अलीभाई शेख,तौसिफ राजे, दुर्योधन गांगुर्डे,सुरेश गोसावी,भगवान पाटील, आदि उपस्थित होते.

सदर मागणी पूर्ण न केल्यास काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा होळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला..

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे