Breaking
महाराष्ट्र

निफाड तहसीलदार कार्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

निफाड दि.२४ डिसेंबर किरण जोशी

निफाड तहसीलदार कार्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात वसंत दंडवते यांनी ग्राहक गीताने केली.

 निफाड तालुक्यातील बिडिओ ऑफिस,नगरपरिषद,नगरपालिका,महावितरण कंपनी,एस टी महामंडळ यांना निवडणूक प्रक्रियेच्या आचारसंहितामुळे त्यांचा अभाव जाणवला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुरवठा निरीक्षण अधिकारी अतुल गायकवाड,नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष वसंत दंडवते, निफाड तालुका संघटक किरण जोशी सह संघटक नारायण पिंपळे,संतोष पी सोनवणे, विजय पाटील,एकनाथ पाचरणे, सीमा डेरले आधी उपस्थित होते, 

 २०२५ या वर्षाची ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत,डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा अशी एक आगळीवेगळी संकल्पना देऊन ग्राहकांना ही जागृती प्लॅटफॉर्म अंतर्गत पोर्टलवर ग्राहकांनी घरबसल्या तक्रार कशी द्यावी व त्याचे निवारण कसे करावे.

याबाबत जनजागृती किरण जोशी यांनी केली. प्रत्येक ग्राहकाने आपली जबाबदारी समजून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्याकडे स्वतःहून तक्रार दाखल केली तर सर्व पदाधिकारी हे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील,असे वक्तव्य ग्राहक पंचायतीचे सदस्य संतोष पी सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले,

पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन उल्हास टरले यांनी केले,नारायण पिंपळे यांनी आभार मानले. ग्राहकतीर्थ कै.बिंदू माधव जोशी यांच्या लिखित पुस्तकाचे संघटकांची अष्टाध्यायी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुवर्णा जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी,डी केदारे,तालुका कृषी अधिकारी जे आर क्षिरसागर, पोलीस आर जे बागुल, रेडगावचे सरपंच नवनाथ चव्हाण, गायत्री गॅस एजन्सी चे शत्रुघ्न कानडे,सप्तशृंगी गॅस एजन्सी, राजेश्वरी भारत गॅस एजन्सी सागर खडताळे, प्रदीप कापसे दुय्यम निबंधक सौ.डी पी जगताप म टा चे प्रतिनिधी विद्याधर शेनाय,सचिव विविध कार्यकारी सोसायटी,स्वस्त धान्य दुकानदार,पोलीस पाटील योगेश झुरळे,बचत गटाच्या महिला या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे