Breaking
महाराष्ट्र

खडक माळेगाव येथे ओम नवनाथ 84 सिद्धाश्रम नऊ कुंडात्मक नाथ सिद्धी महायज्ञ व गोकुळ अष्टमी

न्यायभूमी न्यूज सपादकिय विभाग

0 8 9 9 8 9

न्यायभूमी न्यूज 

 खडक माळेगाव दि १६ ऑगस्ट मुख्य संपादक दत्तात्रेय दरेकर 

येथे महंत श्री.आंन्ना बाबांच्या कृपा आशिर्वादाने मंगळवार दि.12 /8/ 25 ते शनिवार दि.16 /8 /25 पर्यंत ओम नवनाथ सिद्ध श्रम नऊ कुंडात्मक नाथ सिद्ध महाय यज्ञ व गोकुळ अष्टमी महापर्वावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सद्गुरु विश्वनाथ महाराज यांचे परम शिष्य महंत श्री दिगंबर गिरीजी महाराज (अण्णा बाबा )यांच्या नियोजनाखाली पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकुळाष्टमी महापारवावर नऊ कुंडात्मक नाथ सिद्धी महायज्ञ व सामुदायिक नवनाथ पारायण सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.

  नवनाथ पारायणासाठी परिसरातील साधारण दीडशे ते दोनशे भाविक बसले आहे हरिनाम सप्ताहात रोज सायंकाळी रात्री ९ ते ११हरी नाम कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तुकाराम महाराज वाजे वागदर्डी,दत्तप्रसाद महाराज खडक माळेगाव,विठ्ठल वैजापूरकर, वैभव महाराज भाटगावकर,पुरुषोत्तम महाराज जानोरी,संतोष महाराज भडानेकर अशा महान संतांचा कीर्तनाचा कार्यक्रम रोज रात्री होणार आहे.

सप्ताह काळात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम अहोरात्र होत आहे सदर कार्यक्रमासाठी महंत अण्णा बाबा भक्तगण विशेष परिश्रम घेत आहेत परिसरातील भावीक भक्तांनी या महापर्वाचा लाभ घ्यावा.

अशी नम्र विनंती ओम नवनाथ सिद्ध आश्रम खडक माळेगाव भक्तांच्या व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे