Breaking
महाराष्ट्र

लासलगाव शहर विकास समिती ची मागणी व ‘वर्तमान पत्राच्या’ बातमीची दखल; लासलगावचा पर्यायी रस्ता मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेने दुरुस्त

खाजगी वाहने व बसगाड्यांचा वळसा कमी होण्यास मदत. एसटी प्रवाशांचे वाचणार प्रत्येकी दहा रुपये

1 3 1 4 7 9

न्यायभूमी 

 लासलगाव: दिनांक २६ ऑक्टोंबर

 लासलगाव ते चांदवड मार्गावरील रेल्वे गेट बंद झाल्याने एसटी बसगाड्यांना चार किलोमीटरचा कोटमगाव मार्गाने अतिरिक्त वळसा घालावा लागत होता. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लासलगाव शहर विकास समितीने आंदोलनाचा इशारा देत पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. या समस्येकडे लक्ष वेधणारी वर्तमान पत्रांमध्ये मध्ये प्रसिद्ध झाली होती.

बातमीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेने सुमारे ४०० मीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली तसेच काँक्रीट करण झालेल्या रस्त्याच्या साईड पट्टी देखील भरण्यात आलेले आहे.

त्यामुळे बसगाड्यांसाठी पर्यायी मार्ग सुलभ झाला असून, प्रवाशांचा वेळ आणि अतिरिक्त वाहतूक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.

      लासलगाव शहरातील रेल्वे गेट बंद झाल्यापासून बसगाड्यांना पर्यायी मार्गाने प्रवास करताना सुमारे चार किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत होता. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांचा वेळ खर्च होत होता. विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांनाही या समस्येचा सामना करावा लागत होता.

अतिरिक्त अंतरामुळे वाहतूक खर्च वाढत होता. ही समस्या मार्गी लावण्यासाठी लासलगाव शहर विकास समितीने बँक ऑफ बडोदा ते रेल्वे उड्डाणपुलाच्या वळण रस्त्याला जोडणारा अपूर्ण रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने प्रकाश पाटील, राजेश कराड, संदीप उगले, प्रमोद पाटील, चंद्रकांत नेटारे, बाळासाहेब जगताप,धर्मेश जाधव, शेखर कुलकर्णी, विकास कोल्हे, अनिल भावसार, सुरेश कुमावत , महेश बकरे ,उत्तम वाघ अनिल भागवत संतोष बोराडे नामदेवराव शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळांकडे पाठपुरावा केला. मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला होता. त्यामुळे भुजब मंत्री छगन भुजबळ यांनी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या असता तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे

      पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने एसटी बसगाड्यांचा प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच इंधन व वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.

परिणामी, वाहतूक खर्चातील अतिरिक्त भार कमी होण्यास हातभार लागेल. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेत पोहोचणे सुलभ होणार असून, तसेच लवकरच कायमस्वरूपी बडोदा बँक ते उड्डाणपुलापर्यंत दुतर्फा काँक्रिटीकरण स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे अशी मागणी शहर विकास समितीने केली आहे.

यामुळे लासलगाव शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 4 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे