Breaking
कृषीवार्ता

ई–पिक पाहणी ॲप मध्ये सुधारणा व्हावी:–काँग्रेस नेते,कृषीतज्ञ,सचिन होळकर..

न्यायभूमी न्यूज संपादकिय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि २९ ऑगस्ट निशिकांत पानसरे

महाराष्ट्र सरकारकडून सध्या पीक पेरा लावण्यासाठी शेतकऱ्यांना ईपीक पाहणी या ॲप्सची सुविधा देण्यात आली आहे मात्र या ॲप्स चा वापर करताना अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ॲप्स वापरताना इंटरनेटची आवश्यकता असते पिकपेरा नोंद प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात करावी लागत असल्याने आणि प्रत्येक शेतात इंटरनेटची रेंज नसल्याने त्यांना नोंदणी करणे अवघड जात आहे.

बऱ्याचदा पिक पेरा लावताना तांत्रिक दोष निर्माण होत असल्याने पीक पेरा यशस्वीरिता लावला जात नाही. एका शेताच्या पीक पेऱ्यासाठी अनेकदा प्रयत्न करावे लागत आहे.

सर्वर डाऊन तसेच तांत्रिक दोष यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. ई–पिक पाहणीच्या ॲप्समध्ये अनेक तांत्रिक दोष सातत्याने समोर येत आहे.

या ॲप्स मध्ये तसेच त्याच्या कार्यपद्धतीमध्ये दोष असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीक पेऱ्याची नोंद करणे राहून जात आहे.

यासाठी या ॲप्स सोबतच जुन्या पद्धतीने तलाठी कार्यालयातून पीक पेरा लावण्याची सुविधा देखील सुरू ठेवणे आवश्यक आहे.

सदर ॲप्स द्वारे डिजिटल सहीचा सातबारा तसेच खाते उतारा काढणे त्याचप्रमाणे शेतसारा भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस,प्रसिद्ध कृषीतज्ञ,सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे