0
9
2
0
9
7
न्यायभूमी
विंचूर दि.०५ सुनील क्षीरसागर
निफाड तालुक्यातील विंचूर परिसरातील मारवाडी पेठ येथे कांदा व्यापारी पवन नंदकुमार जाजू याच्यावर विंचूर येथील मनोज बोराडे याने धारदार चाकूने प्राण घातक हल्ला केला.
लासलगाव पोलिसांनी मनोज बोराडे यास अटक केली आहे सुमारे 6:00 वाजेच्या सुमारास पवन जाजू हे आपल्या घरासमोर उभे असताना संशयित आरोपी मनोज बोराडे तेथे येऊन मारहाण करू लागला.
चाकूने वार करून हल्ला केला व तिथून फरार झाला जखमी पवन जाजू खाली कोसळला स्थानिक नागरिकांनी तात्काळ जाजू यास लासलगाव येथील खाजगी रुग्णालय मध्ये दाखल केले.
मात्र जखमा मोठ्या असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.लासलगाव पोलिसांनी आरोपी मनोज बोराडे याला ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे..
0
9
2
0
9
7



