राजनंदिनी अहिरे,विजय बागुल,अश्विनी सांगळे,अश्विनी पुरी नाशिक यांना महाराष्ट्र नायक पुरस्काराने सन्मानित
न्यायभूमी न्युज संपादकीय विभाग

न्यायभूमी
नाशिक दि.०३ जून रोशन गव्हाणे

बी एस एफ बहुद्देशीय संस्था अमरावती, उपेक्षित नायक न्यूज व सत कबीर बहुद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे नाशिक येथे निलगिरी बाग परिसर धनलक्ष्मी बॅंकवेट हॉल या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम मुख्य आयोजक भूषण सरदार व आर्यमेघ सरदार हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या फोटोचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचा संकल्प सन्मानातून साकार होणार वृद्धाश्रम हा होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून हिंदू मजदूर संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कार्तिक अर्जुन डांगे, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी,राजनंदिनी आहिरे, विजय बागुल, रोशन गव्हाणे,अश्विनी सांगळे, अश्विनी पुरी,डॉ,रावसाहेब घोडेराव, डॉ.गणेश व्यवहारे, सामाजिक कार्यकर्त्यां वैशाली सोनवणे,लोकमत पत्रकार विष्णू गायकवाड, प्रसिद्ध मॉडेल स्मिता माटेकर,रितिका साळुंखे,लिलावती कापडणीस, प्रसिद्ध साहित्यिक सतीश शिंदे,अशोकभाऊ नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्र मधून 400-500 लोकांची उपस्थिती होती. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.