विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात”गुरुपौर्णिमा”मोठ्या उत्साहात साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १० जुलै मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन केले.
हा कार्यक्रम इयत्ता 10वी ब च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या घडवून आणला.यावेळी विद्यालयातील,जाधव स्नेहल,शिंदे रसिका, प्रतिक्षा जाधव,पद्मनाभ आभाळे (10ब ) सिद्धी बंद्रे,धनश्री वाळेकर(6क)या विद्यार्थ्यांनी भाषणातून गुरु विषयीचे आपले मत व गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी व्यक्तिला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर,एक तरी गुरु असावा असे मत व्यक्त केले.
तसेच विद्यालयाचे उप मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीतून गुरूचे महत्त्व समजावून सांगताना”जे जे चांगले ते ते घ्यावे व जे जे ते नको ते सोडावे “असा गुरुमंत्र दिला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सत्कार करून आपली गुरु विषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रावणी गोराडे व धनश्री पुंड यांनी केले.

भक्ती चेवले हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले.सदर कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक माळी एस टी,चांदे आर के लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था,सातारा विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते


