नू.वि.प्र.इंग्लिश मीडियम स्कूल,लासलगाव विद्यालयाचा इ.8 वी तील राजेश तुपे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात नववा तर तालुक्यात प्रथम येत ठरला शिष्यवृत्ती पात्र
न्यायभूमी
लासलगाव दि.०५ जुलै कैलास उपाध्ये
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी.या परीक्षेत नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल,लासलगाव. या विद्यालयातील इ. 8 वी चा राजस प्रशांत तुपे या विद्यार्थ्याने तालुक्यात प्रथम स्थान तर जिल्ह्यात नववे स्थानपटकावत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला.
त्याच्या या यशाचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांनी विशेष कौतुक केले व उज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हसमुख भाई पटेल,सचिन मालपाणी,चंद्रशेखर होळकर,योगेश पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आचार्य, उपमुख्याध्यापिका मिनल होळकर,परीक्षा विभाग व माध्यमिक विभाग प्रमुख तुकाराम केदारे,प्राथमिक विभाग प्रमुख मंजु वाधवा यांनी सर्व शिक्षकांचे आणि राजस चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



