Breaking
कृषीवार्ता

नैताळे व मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रांवर गुरूवार पासुन द्राक्षेमणी शेतीमाल लिलावास सुरूवात.– ज्ञानेश्वर (डीके) जगताप.

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी

निफाड दि.१७ फेब्रुवारी बाबा गीते 

नैताळे व मानोरी खुर्द परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या नैताळे व मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर गुरूवार (दि. 19 फेब्रुवारी) पासुन द्राक्षेमणी लिलाव सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डीके) जगताप यांनी दिली.

खानगांव नजिक व उगांवसह परीसरातील नांदगांव, डोंगरगांव,रूई,धानोरे,कोळगांव, खेडलेझुंगे, धारणगांव वीर,धारणगांव खडक, नांदुरमध्यमेश्वर,गाजरवाडी,नैताळे,सोनेवाडी, श्रीरामनगर,शिवरे,शिवडी,खेडे,वनसगांव,नांदुर्डी, कुंदेवाडी,खडक माळेगांव,सारोळे खुर्द,रानवड आदि गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय जवळच निर्माण व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीतर्फे दरवर्षी उगांव, खानगांव नजिक,नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षेमणी शेतीमालाचे खरेदी-विक्री केंद्र सुरू केले जाते.

सदर केंद्रांस परीसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांकडुन दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी नैताळे व मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रांवर गुरूवार (दि. 19 फेब्रुवारी) पासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीसरातील शेतकरी बांधवांनी नैताळे व मानोरी खुर्द येथील खरेदी-विक्री केंद्रांवर गुरूवार (दि. 19 फेब्रुवारी) पासुन दररोज दुपारी 04.00 वा. आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा.

वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली असुन द्राक्षेमणी खरेदी करण्यासाठी जास्त व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.

 शेतकरी बांधवांनी आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल बाजार समितीच्या खरेदी-विक्री केंद्रांवरच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डीके) जगताप, उपसभापती संदीप (ललीत) दरेकर व सर्व सदस्य मंडळाने केले असुन बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाऱ्या द्राक्षेमणी खरेदीदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेले आहे.

तसेच बाजार समितीच्या नैताळे व मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी खरेदीस इच्छुक असणाऱ्या नविन व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी,शर्तींची पुर्तता केल्यास त्यांना तात्काळ परवाना देण्यात येईल. तरी इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा.

त्याचप्रमाणे गुरूवार, दि. 19 फेब्रुवारी, 2026 रोजी नैताळे खरेदी-विक्री केंद्रावर दुपारी 04.00 वा. व मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रावर दुपारी 05.00 वा. होणाऱ्या द्राक्षेमणी लिलाव शुभारंभप्रसंगी परीसरातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटींचे व ग्रामपंचायतींचे सदस्य,द्राक्षेमणी उत्पादक शेतकरी,अडते,व्यापारी,मदतनीस,कामगार आदि घटकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे