एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रोहित कैलास पोटे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पी.एच.डी यशस्वीपणे पूर्ण
न्यायभूमी न्यूज येवला पुष्पा पाटील
न्यायभूमी दि ०६ सप्टेंबर
एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रोहित कैलास पोटे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पीएचडी यशस्वीपणे पूर्ण केली.
प्रा.पोटे एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर पदावर कार्यरत आहेत.
डॉ.रोहित कैलास पोटे यांनी“पाऊंडिंग रिस्पॉन्स ऑफ लो राइझ स्ट्रक्चर अंडर सेस्मिक ऍण्ड ब्लास्ट ऍक्शन्स”या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे अंतर्गत यशस्वीपणे पीएच.डी.प्रबंध सादर केला आहे.

त्यांच्या संशोधन प्रबंध डॉ.निलेश माटे ( अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर ) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री.किशोरभाऊ दराडे,सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे,संचालक श्री रुपेश भाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे,प्राचार्य डॉ डी.एम यादव,सर्व विभागप्रमुख,व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
डॉ.रोहित पोटे यांनी यांनी हे यश आई वडील, पीएचडी मार्गशिक्षक व सहकारी शिक्षक यांना समर्पित केले.



