नाशिक कायद्याच्या बालेकिल्ल्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील एकुण १०५ खून
११ महिन्यांत नाशिक शहरात विक्रमी ४६ आणि जिल्ह्यात ५९ हत्या
न्यायभुमी
नाशिक दि.२० डिसेंबर रोशन गव्हाणे
नाशिक,शहरात जानेवारी ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत नाशिक शहरात रेकॉर्डब्रेक ४६ खून झाले असून,जिल्ह्यात ५९ खून झाले आहेत. जिल्ह्यातील ५९ पैकी ५७खूनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात नोव्हेंबर २०२३ ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरात ८६ हून अधिक खूनाच्या घटना घडल्या आहेत.
हे खून प्रेमप्रकरण,वैयक्तिक वाद व कौटुंबिक वाद,वर्चस्व व दहशतीसाठी,बेरोजगारी व नशेखोरी,सूडाची भावना व क्षुल्लक कारणातून झाले आहेत.
नाशिक शहरात यंदा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाईसह सोशल मीडियावरील ‘रील्स’वरून गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्यांमुळे सर्वाधिक खून झाले आहेत.
उपनगरमध्ये दोन सख्ख्या भावांचा खून झाला. राजकीय वादातून नांदूरनाका परिसरात एका युवकाचा खून करण्यात आला.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ७ खून झाले.विशेष म्हणजे,शहरात दोनवेळा एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत.