Breaking
आरोग्य व शिक्षण

वैनतेय विद्यालयामध्ये आयोजित निफाड तालुका स्तरावरील डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी

निफाड दि.०९ डिसेंबर

 

Oplus_131072

 रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी निफाड येथील वैनतेय विद्यालयlमध्ये डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा पुढारी पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड अँड निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानाने निफाड येथे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही परीक्षा इयत्ता दहावीच्या च्या गटासाठी आयोजित करण्यात आली होती.

तसेच ही परीक्षा शंभर गुणांची होती. या परीक्षेमध्ये तालुक्यातील विविध शाळेतील चौदाशे मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा अविनाश पंगे जनता विद्यालय नांदुर्डी शंभर पैकी ७७ गुण मिळवून तिने प्रथम क्रमांक मिळविला.

तसेच द्वितीय क्रमांक प्रणव दीपक शिंदे जनता विद्यालय नांदुर्डी ७३ गुण,तृतीय क्रमांक धनश्री संतोष घाडगे.श्री.डी आर.बी.विद्यालय विंचूर ७० गुण,चौथा क्रमांक यश दिगंबर वाघ वैनतेय विद्यालय निफाड ६८ गुण,पाचवा क्रमांक कल्पेश सचिन कुयटे.श्री.महिमन इंग्लिश मिडीयम स्कूल निफाड.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सी यु नाईकवाडे सर यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी न्यायमूर्ती रानडे विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री.वि.दा.व्यवहारे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा,वेळेचे महत्व, तसेच डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवन व विचारांचे महत्त्व आपल्या भाषणातून पटवून दिले तसेच वैनतेय विद्यालयाचे विश्वस्त मा.श्री. राजाभाऊ राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, विश्वस्त.श्री.किरण भाऊ कापसे,विश्वस्त श्री.सोनी साहेब,व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निफाड पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक श्री. बाविस्कर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी ४० शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्यातील प्रज्ञेचा शोध घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा कोल्हे व थेटे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री पानगव्हाणे सर यांनी केले.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे