एस एन.डी.अभियांत्रिकीच्या प्रथमेश ला फेसबुक मध्ये त्रुटी शोधल्या बद्दल
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि १३ फेब्रुवारी पुष्पा पाटील
एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र बाभुळगाव ता येवला येथील द्वितीय वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चा विध्यार्थी प्रथमेश पाटील याने फेसबुक मधील त्रुटी शोधली व त्याने फेसबुक ला निदेर्शनास आणून दिले.
सदर त्रुटी निदेर्शनास आणून दिलेबद्दल फेसबुक कडून त्याला तब्बल ३१७५० डॉलर ( २७ लाख ) रक्कम बक्षीस देण्यात आली. प्रथमेश मुळातच आय टी मध्ये आवड आहे तो सायबर क्राईम यंत्रणेला संगणक, नेटवर्क किंवा डिजिटल उपकरणांचा केलेल्या \ गुन्हेगारी शोधण्यामध्ये सुद्धा मदत करतो . यामध्ये बँक अकॉउंट हॅकिंग , फिशिंग, , रॅन्समवेअर आणि मालवेअर हल्ल्यांचा समावेश आहे.
सदर प्राचार्य डॉ डी एम यादव इंन्फोर्ममेशं टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ व्ही आर निकाम यांनी अभिनंदन केले .


