Breaking
महाराष्ट्र

सिन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि ०७ में विशेष प्रतिनिधी 

 महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या सिन्नर शाखेतर्फे विविध मागण्यांसाठी तालुका कृषी अधिकारी सिन्नर कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

संघटनेने टप्पा निहाय आंदोलन हाती घेतले असून सोमवारी ता-5 मे रोजी काळ्याफिती लावून कामकाज करणे. मंगळवारी ता -6 मे रोजी दुसऱ्या दिवशी कृषी सहाय्यक सर्व शासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडले.

आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बुधवारी ता 7 मे रोजी आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक धरणे आंदोलन केले.

यावेळी कृषी सहाय्यकांनी जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

उद्या ता-8 मे रोजी सर्व कृषी सहाय्यक एक दिवसाच्या सामूहिक रजेवर जाणार आहेत.

त्यानंतर पुढचा टप्पा ता-9 मे रोजी शुक्रवार सर्व कृषी सहाय्यक सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार असून त्या पुढचा टप्पा ता -15 मे पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर कामकाज बंद आंदोलन सुरू केले जाईल.

संघटनेच्या या आहेत प्रमुख मागण्या

1) कृषी सेवक पद रद्द करून नियमित नियुक्ती करावी. 

2) नावात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी करावे. 

3) कामकाजासाठी लॅपटॉप द्यावा. 

4) ग्राम स्तरावर कामकाजासाठी मदतनीस द्यावा. 

5) विविध निविष्ठा वाहतूक करण्यासाठी भाड्याची तरतूद करावी.

6) आकृतीबंध मंजुरी देऊन कृषी पर्यवेक्षक ही पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीतील कुंडीत अवस्था दूर करावी.

7) रोजगार हमी योजनेअंतर्गत लक्ष देताना क्षत्रिय अडचणींचा विचार करावा. 

8) नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्यात महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्याबाबत न्याय संघात कार्यपद्धती करावी. 

9) कृषी सहाय्यक संवर्गाच्या स्थापना विषयी अडचणीची सोडवणूक करावी.

आधी मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर आव्हाड,कृषी सहायक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्याम गडाख , नितीन खिंडकर,दिपक कुसळकर,केवलसिंग पवार ,गरूड साहेब,ठोबंळसाहेब , गायकवाड साहेब,दराखा साहेब,तांबे मॅडम, भोर मॅडम,लावरे मॅडम, शिंदे मॅडम उगले मॅडम ,भदाणे मॅडम यांचेसह सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे