न्यायभूमी न्यूज
विचूर दि 01 ऑगस्ट सुनील क्षीरसागर
विंचूर येथील लासलगाव रस्त्यालगत होळकर वेशीच्या समोर ‘श्री रामेश्वर महादेव’ मंदिरात महादेवाची पिंड व नंदी यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा विंचूरचे संदीप गुरु जोशी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
या मूर्तीचे रथातून सहवाद्य,फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली असून,या पूजेसाठी विनोद दरेकर,दादू दरेकर, राजेंद्र गोसावी,श्याम सानप,सोमेश्वर दरेकर, निलेश दरेकर या सहपत्नीक जोडपी पूजेस बसले आहे.
या कार्यक्रमासाठी रत्नाकर दरेकर,भैय्या कर्पे, गोपाळ दरेकर यांनी विशेष योगदान दिले आहे.
तर या कार्यक्रमासाठी उपस्थित विंचूरचे प्रथम नागरिक सचिन दरेकर,निलेश सालकाडे,अनिल पुंड, दीपक दरेकर,अनिल थोरात,चंद्रकांत दरेकर, सोनू दरेकर,मारुती दरेकर,आत्माराम दरेकर, ऋषी आहेर,नवनाथ दरेकर,अलोक दरेकर,सागर गरड,वसंत गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आणि या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानी झाली असून, अनेक शिवप्रेमी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला..



