Breaking
संपादकीय

निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या नामघोषात श्री क्षेत्र विष्णुनगर येथून दिंडीचे प्रस्थान

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 7

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि २२ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

  श्री क्षेत्र विष्णुनगर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सालाबाधाप्रमाणे हे चाळीस वर्षाची परंपरा विष्णूनगर येथून चालू आहे वै,ह,भ,प कारभारी मास्तर बाबा यांच्या स्मरणार्थ वै,गु. वै. ह भ. प.दिगंबर महाराज अंमळनेरकर यांच्या कृपा प्रसादाने श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा ह.भ. प. एकनाथ महाराज सदगीर व ह. भ.प.देवराम महाराज बोंबले ह. भ. प किसन महाराज शेळके ह.भ.प सयाजी महाराज बोंबले ह.भ. प निलेश महाराज घायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दिंडी सोहळा सोमवार दिनांक 20/01/2025रोजी त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान झाले.

दिंडीत सामील झालेल्या भावीक भक्तांना यावेळी गावकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात निरोप देऊन दिंडी मार्गस्थ झाली. 

या पायी दिंडीचा निफाड,ओढा , नाशिक व त्र्यंबकेश्वर असा मार्गक्रम असणार असून भाविकांना ठिकठिकाणी सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्री चहा नाश्ता, जेवणाची व्यवस्था संबंधित दानशूरांकडून करण्यात आली आहे. दिंडीत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, अबाल वृद्धांचा समावेश आहे.

धन्य धन्य निवृत्ती देवा

काय महिमा वर्णावा।।

 विष्णुनगर येथे सकाळीच घायाळ पाटील परिवाराकडून चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, वेळप्रसंगी भारुडाचा कार्यक्रम होईल असे समस्त भजनी मंडळांनी सुचवले आहे.

दिंडी यशस्वीरित्या व सुखरूप पार पाडावी यासाठी श्री देव मारुती देवस्थान ट्रस्ट व जगद्गुरु तुकाराम महाराज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ विष्णूनगर हे परिश्रम घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे