Breaking
गुन्हेगारी

दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेवर अत्याचार; धारणगावचा‘भोंदू महाराज’गजाआड

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 1 5 0 9

न्यायभूमी :

विंचूर (नाशिक) दि.२५, सुनील क्षिरसागर 

स्वतःला ‘महाराज’ म्हणवून घेत दैवी शक्तीचा बनाव रचणाऱ्या एका भोंदू बाबाने २८ वर्षीय विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१, रा. धारणगाव खडक) याला अटक केली आहे. निफाड न्यायालयाने आरोपीला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​नेमकी घटना काय?

​पीडित महिला कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे त्रस्त होती.या परिस्थितीचा फायदा घेत तिच्या पालकांनी तिला धारणगाव येथील ‘प्रतिगाणगापूर’ मठात नेले.

तेथे आरोपी महेशगिरी याने “तुला बाधा झाली आहे” असे सांगून धार्मिक विधीच्या बहाण्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवला.त्यानंतर त्याने तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवून मानसिक छळ सुरू केला.

​बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग:२३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपीने पीडितेला नाशिक येथे बोलावून त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. “माझ्याकडे दैवी शक्ती आहे,तू माझा विरोध करू शकणार नाहीस,” अशी भीती दाखवत तिच्यावर बलात्कार केला.

धमकी आणि पुरावे नष्ट करणे:आरोपीने पीडितेचे विवस्त्र फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मोबाईलमधील मेसेजही डिलीट केले.

​’अंनिस’च्या पुढाकाराने तक्रार दाखल

​आरोपीच्या भीतीमुळे पीडित कुटुंब सुरुवातीला तक्रार करण्यास घाबरत होते.मात्र,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (ANIS) कार्यकर्त्यांनी पीडितेला धीर दिल्यानंतर तिने लासलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.

​न्यायालयीन कारवाई

​पोलिसांनी आरोपीवर बलात्कार तसेच ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस.सुक्रे यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता मनोज तोरणे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य मांडत सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांचे आवाहन

​”सदर भोंदू बाबाकडून अन्य कोणाची फसवणूक, आर्थिक गंडा किंवा छळ झाला असल्यास त्यांनी भीती न बाळगता तात्काळ लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पीडितांची ओळख गोपनीय ठेवली जाईल.”

— दीपक पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव)

तपास यंत्रणा: सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून,कोठडीदरम्यान आणखी काही महिलांची फसवणूक झाल्याचे समोर येण्याची शक्यता आहे.

3.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे