परतीच्या पावसामुळे शेतीचे संकट वाढले शेतकरी हवालदिल
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभुमी न्यूज / अजिज काद्री
देवगाव दि.२७ ऑक्टोंबर अजिज काद्री

परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून शेतकरी चिंतातूर झाला.पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोगुंन ठेवलेली पिके खळ्यावर आनता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटु लागले आहे.खरीप पिकांवरील संकटे थांबता थांबेनात.
आज पिके काढण्याची वेळ आली तर पाऊस थांबता थांबेना. परिसरातील द्राक्षांसारखी महागडे पिके यावर्षी घ्यावीत किंवा सोडुन द्यावीत असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
शेतीकामाचे संपुर्ण वेळापत्रकच या बेमोसमी पावसामुळे कोलमडलेले आहे.
काढणीस आलेली पिके सतत पडत असलेल्या पावसामुळे वाया जाणार असल्याचे चिन्ह निर्माण झाली आहे.त्यामुळे शेकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होणार आहे.

मान्सुन संपल्यानंतरही पावसाचा दणका कायम आहे. खरीप पिकांची मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.
परिसरामध्ये सलग तीन दिवसापासून रात्री होणाऱ्या पावसामुळे शेतीकामाचे नियोजन बिघडले असुन शेतीमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.
धरणातील जास्तीचे पाणी कालव्याने सोडलेले असल्याने ओढे,नाल्या,चाऱ्या ओव्हरफ्लो ने वाहत आहे. शेतात पाणी साचल्याने शेती पिके सडत आहे.मक्याचा चारा शेतात पडून असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.
या पावसामुळे कांदा,मका,सोयाबीन व द्राक्षबागांना फटका बसला आहे.बाजरी, सोयाबीनव मका पिकाची काढणीचा हंगाम सुरु असुन पावसामुळे सोंगणीची कामे थांबलि आहेत. उन्हाळी कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे खराब होतआहेत.
टोमॅटो,मका कांदा या पिकांचेही नुकसान झाले आहे.
निफाड तालुक्यातील बऱ्याच भागातील द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसामुळे खरीप पिकांच्या कापणीला मोठा दणका बसलेला असुन सर्व शेतीकामे ठप्प झाली आहेत.

सोयाबीन,बाजरी भिजल्याने डाग तसेच बुरशी आल्याने सोयाबीन कमी दराने विक्री करावी लागणार आहे.