चांदवड शहरात बेमोसमी मुसळधार पावसामुळे मातोश्री नगरमध्ये घराची भिंत कोसळली सविस्तर वृत्त
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
चादवड दि.२८ ऑक्टोंबर
दि.२६ ऑक्टोबर २०२५ रविवार रोजी चांदवड शहरात बेमोसमी मुसळधार पाऊस झाला असल्याने या पावसात शहरातील वरचे गाव येथील मातोश्री नगरमध्ये राहणाऱ्या अन्वर बनिमिया बागवान यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु प्रचंड वित्तहानी झालेली आहे. भिंत कोसळल्यामुळे संपूर्ण घराचे नुकसान झालेले आहे.
या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे.आज हे कुटुंब बेघर झालेले आहे.
या घटनेची माहिती मिळताच राजाभाऊ आहिरे यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
राजाभाऊ आहिरे,नगरपरिषदेचे इंजिनिअर क्षीरसागर साहेब व पाटील साहेब तात्काळ घटनास्थळी पोहचले व भिंत कोसळलेल्या घराची पाहणी केली.
भिंत कोसळलेल्या घराची पाहणी करताना राजाभाऊ आहिरे,नगरपरिषद इंजिनिअर क्षीरसागर साहेब व पाटील साहेब उपस्थित होते.
शासनाने तात्काळ या कुटुंबाला घर मंजूर करून देण्यात यावे व आर्थिक सहाय्य करण्यात यावे, तसेच येथे राहणाऱ्या कुटुंबाला सुरक्षित जागेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे.
अशी मागणी यावेळी राजाभाऊ आहिरे यांनी केली.



