एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयात”रोल ऑफ रोबोटिक्स ऍण्ड मेकॅट्रॉनिक्स ईन इंडस्ट्री”या सहा दिवसीय ऑनलाइन अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ला यशस्वीपणे संपन्न
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी न्यूज
येवला दि २७ सप्टेंबर पुष्पा पाटील
एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला व एआयसीटीई अटल मार्फत “रोल ऑफ रोबोटिक्स ऍण्ड मेकॅट्रॉनिक्स ईन इंडस्ट्री ” या सहा दिवसीय एआयसीटीई डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑनलाईन यशस्वीपणे संपन्न झाला.
सदर प्रोग्रॅम साठी देशभरातून २५० हुन अधिक प्राध्यापक जॉईन झाले.सदर प्रोग्राम साठी एआयसीटीई अटल मार्फत एक लाख रुपयाचा निधी मिळणार आहे.
उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ देवकर म्हणाले कि रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात संशोधनासाठी भरपूर संधी आहेत कारण तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे.प्राध्यापकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे.

प्राचार्य डॉ डी एम यादव म्हणाले कि औद्योगिक प्रक्रिया,डेटा हाताळणी आणि ग्राहक सेवा यांसारख्या क्षेत्रात मानवी कार्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांची जागा घेण्यासाठी रोबोट्स आणि स्वयंचलित प्रणालींचा वापर वाढत आहे.
त्यामुळे संशोधनास खूप वाव आहे हा प्रोग्रॅम दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन झाला .
एकूण तेरा ऑनलाइन सत्र झाले डॉ हितेश ठाकूरे रिसेन्ट ट्रेण्ड्स एन ऑटोमोबाईल ऍण्ड रोबोटिक्स , श्री प्रतीक काकडे यांनी सीएई ऍण्ड व्हर्चुअल टेस्टिंग श्री प्रणव लाड यांनी रोबोटिक्स प्रोग्रामिंग श्री कल्पेश पाटील यांनी रोबोटिक्स सिस्टीम डॉ ए डी विखर यांनी रोबोट कम्युनिकेशन प्रोटोकॉल डॉ किरण भोळे यांनी रिसेन्ट अड्वान्सेस इन अडेटिव्ह मॅनुफॅक्टरइजिंग डॉ पी एम सोळंखी यांनी पीएलसी सिस्टिम डॉ ए डी बागुल यांनी इंटरफेस रोबोट AND पीएलसी रोबोटिक्स अप्लिकेशन श्री आनंद बंग यांनी एआय इन रोबोट्स श्री विकी वखरे यांनी आय ओ टी बेस्ड ऑटोमेशन डॉ सुनील कदम यांनी इंडस्ट्री ४. ० आणि श्री सचिन पाटील यांनी ऑप्टिमिझेशन ऑफ इंडस्ट्रियल रोबोट या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे संचालक श्री रुपेश भाऊ दराडे , प्राचार्य डॉ डी एम यादव शैक्षणिक अधिष्ठाता प्रा एस एस येवले रजिस्टर डॉ डी पी क्षीरसागर व ईतर विभागप्रमुख होते कार्यक्रम समन्वयक मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ एच यू पवार व उप समन्वयक मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ एच एस राणे आहेत.
विद्यार्थी विकास अधिष्ठाता डॉ ए बी भाने प्रा टी व्ही गुजराथी प्रा एच आर आहेर प्रा एस जी सावंत व प्रा पी आर गोरे यांनी आयोजन केले.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे,आमदार श्री.किशोरभाऊ दराडे,सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे,श्री रुपेशभाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी अभिनंदन केले.


