पाँल इग्लिश मिडीयम स्कुल,येवला येथे तालुका स्तरीय फुटबाँल स्पर्धा संपन्न
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी न्यूज
येवला दि ११ ऑगस्ट पुष्पा पाटील

येवला- दि.८ ऑगस्ट २०२५ गुरुवार रोजी डी. पाँल इग्लिश मिडीयम स्कुल,येवला येथे तालुका स्तरीय फुटबाँल स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेसाठी तालुक्यातील १२ शाळेंनी सहभाग नोदविला.खेळाची सुरुवात तालुका क्रिडा संयोजक श्री.नवनाथ उंडे सर श्री अमोल राजगुरू सर,श्री सचिन पडांळके सर,श्री नीरा शेख सर,श्री दत्तू उगले सर,श्री संदीप कापसे सर, श्री विकास सानप सर,श्री उज्वल पुराणिक सर, श्री संचित कानडे सर,सुमित गायकवाड सर, प्रवीण घोगरे सर यांच्या हस्ते करण्यात आली.
स्पर्धा या तीन वयोगटांमध्ये घेतल्या गेल्या तृतीय सामना एस एन डी इंग्लिश मीडियम बाबुळगाव वर्सेस आत्मा मालिक पुरणगाव यांच्यात लागला.
आत्मा मालिक 0 एस एन डी इंग्लिश मीडियम 2 आशा अटीतटीच्या या सामण्यात एस.एन.डी. इग्लिश मिडीयम स्कुल,बाभूळगाव.शाळेच्या दोन संघानी विजयी सलामी देऊन जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ केली.

विजयी संघातील खेळाडूचे संस्थेचे संचालक श्री.रुपेशभाऊ दराडे,शाळेचे प्राचार्य शिदे सर,उपप्रचार्य श्री.पाटील सर,श्री.बंड सर,श्री. सुभाष सोनवणे सर,श्रीमती.शेळके मँडम यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेचे क्रिडा शिक्षक श्री.जय मुटेकर सर व श्री.संचित कानडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन विजय संघातील खेळाडूना लाभले.
