माणिक रघुनाथ मढवई माध्य.विद्यालयातील प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि २७ जानेवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन श्री केशवराव यशवंतराव जाधव( शिवसेना ता.गट समन्वयक व ग्रा. पं सदस्य टाकळी ) यांचे हस्ते करण्यात आले. ध्वजपुजन:संस्थचे जेष्ठ संचालक विलासराव सोमवंशी दादा, उपसरपंच योगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश बाळासाहेब पवार हे होते. (उपसरपंच ग्रामपंचायत कोटमगाव) माजी . उपसरपंच प्रमोद पवार , संस्थेचे सचिव प्रतीक मढवई , पालक शिक्षक संघ अध्यक्ष संजय शिरसाठ , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ गांगुर्डे ,दीपक शिंदे( प्रहार संघटना कार्यकर्ते.) सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता पूजन व संस्थापक अध्यक्ष माणिकराव मढवई सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इयत्ता ८ वी .च्या विद्यार्थीनी. श्रावणी गायकवाड ,हर्षदा गुरगुडे, रुपाली गुरगुडे, कार्तिकी बंदरे ,अनुष्का शिरसाठ यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवात केली.
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता मढवई यांनी प्रास्ताविकातून शाळेचा स्थापनेपासूनचा आढावा दिला. त्यानंतर कु . प्रणिती साप्ते ,कु प्रांजली मोरे , इ.10वी व कु श्रावणी गायकवाड इ.8वी .हिने खरी देशभक्ती व तिचे खरे स्वरूप व महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केशवराव यशवंतराव जाधव यांनी आपल्या भाषणामधून शाळेसाठी व्यासपीठ बांधून देणार असल्याचे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष माणिकराव मढवई यांच्या जन्मदिनी विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच श्रावणी गायकवाड हिने वैनतेय विद्यालय निफाड येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु 5001 व ट्रॉफी बक्षीस मिळविले.
तिचा सत्कार श्री. केशवराव जाधव.शिवसेना तालुका समन्वयक व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच शासकीय क्रीडा कुस्ती स्पर्धेत विभागीय यश संपादन केलेलें प्रेम केदारे याचाही सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला ह्या विद्यार्थ्यांना अशोक गलांडे व परशराम गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेतर्फे सचिव श्री.प्रतिक मधवई,श्री. केशवराव जाधव.मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई श्री विलासराव सोमवंशी संचालक ,श्री.योगेश पवार यांच्या हस्ते या कर्तव्यदक्ष. शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी व इतिहास विषय तज्ञ. शिक्षक अशोक गला गलांडे यांनी केले.कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ , पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,आजी-माजी विद्यार्थी हजर होते.

कार्यक्रम यशस्वीततेसाठी अशोक गलांडे , मगन केदारे ,परशराम गांगुर्डे जयेश कदम, बाळासाहेब दिवटे ,ज्ञानेश्वर देवडे यांनी प्रयत्न केले अध्यक्षीय भाषणाने व वंदे मातरम गीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.


