विंचूर येथील येवला रोड वरील स्वामी समर्थ कॉलनीतून रविवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चोरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०४ जून विशेष प्रतिनिधी

विंचूर- येथील येवला रोडवरील स्वामी समर्थ कॉलनीतून रविवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विंचूर परिसरात वाहनांच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहेत.
येथील मुंकदा बाहीकर व ज्ञानेश्वर बाहीकर यांचा हॉटेल व्यवसाय आहे.त्यांनी हॉटेल व घरगुती कामासाठी नाशिक येथून पियाजो कंपनिची एपे रिक्षा (क्र.एम एच १५ डी एम ३९५०) विकत घेतली होती.
ज्ञानेश्वर बाहीकर हे रविवार ता.०१ रोजी रात्री ११ वाजता हॉटेल वरून येवला रोडवरील स्वामी समर्थ कॉलनी येथील राहत्या घरी रिक्षा घेऊन गेले.घरासमोर नेहमीच्या ठिकाणी रिक्षा उभी केली.
त्यानंतर ते जेवण करण्यासाठी घरात गेले.त्यांचे बंधू मुकुंदा बाहीकर हॉटेलचे कामकाज आवरून रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घरी आले.
त्यावेळी त्यांना घरासमोर रिक्षा उभी दिसली नाही.त्यांनी घरात झोपलेल्या ज्ञानेश्वरकडे चौकशी केली असता ज्ञानेश्वरने सांगितले.
मी घरासमोरच रिक्षा उभी केली होती व मी जेवण करुन झोपलो होतो.
त्यानंतर घरातील सर्वजण आजुबाजुला रिक्षाचा शोध घेवू लागले.
परंतु त्यांना रिक्षा मिळून आली नाही.
तेव्हा रिक्षा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध रिक्षा चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
परिसरात चोरीच्या घटना अशा वारंवार घडत असल्याने नागरिकांनी आपले वाहन सुरक्षित ठिकाणी लावण्याचे आव्हान लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.