महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त लासलगाव महावितरण तर्फे बुधवार दिनांक 04/06/2025 रोजी लासलगाव उपविभाग येथे रॅली चे आयोजन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०४ जून प्रतिनिधी हरिष भागवत

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात 01 ते 06 जून 2025 दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून लासलगाव उप विभागा अंतर्गत लासलगाव उपविभाग महावितरण यांचे विद्यमाने बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता महावितरण कर्मचारी यांची रॅली आयोजित करण्यात आली होती.

सदर रॅली मध्ये ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेच आवाहन करण्यात आले.
” सदर रॅली लासलगाव उपविभागीय कार्यालय येथून सुरू होऊन लासलगाव शहरा मधून जाऊन लासलगाव शहर कक्ष कार्यालय कमलाकर टॉकीज येथे समाप्त झाली.

सदर रॅली मध्ये लासलगाव उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी,बाह्यस्रोत कर्मचारी,सुरक्षा रक्षक मोठ्यासंख्येने सहभागी झाले.

सदर रॅली यशस्वी करण्या करिता मा.कार्यकारी अभियंता श्री.केशव काळुमाळी साहेब व प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री.किरण काकड साहेब यांनी मार्गदर्शन केले.

सदर रॅली व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री दिनेशसिंग राजपूत सहाय्यक अभियंता देवगाव कक्ष,श्री अजय सावळे सहाय्यक अभियंता लासलगाव शहर कक्ष,श्री प्रदीप नाईक सहाय्यक अभियंता लासलगाव ग्रामीण कक्ष,श्री नितीन निकम कनिष्ठ अभियंता सारोळा कक्ष,श्री प्रदीप भालेराव कनिष्ठ अभियंता वाकद कक्ष,दिव्या पवार कनिष्ठ अभियंता,किरण कांडेकर सहाय्यक अभियंता,श्री राजेंद्र पिंजन सहाय्यक लेखापाल, श्री अरुण चोथमल, निम्नस्तर लिपिक,श्री नवनाथ कोकाटे उच्चस्तर लिपिक,सोनाली शेजवळ उच्चस्तर लिपिक,दिपाली देवरे निम्नस्तर लिपिक,श्री अवधूत मोरे निमस्तर लिपिक व श्री पंडित खैरनार मुख्य तंत्रज्ञ लासलगाव उपविभाग यांनी प्रयत्न केले.




