Breaking
आरोग्य व शिक्षण

नूतन विद्यालय खडक माळेगावचा दैदिप्यमान यश:एस.एस.सी.निकाल 95.94%आकांक्षा ज्ञानेश्वर रायते शाळेत प्रथम

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

कोटमगाव दि १४ में विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर 

खडक माळेगाव (ता. निफाड) | शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन विद्यालय खडक माळेगाव येथील एस.एस.सी. मार्च 2025 चा निकाल 95.94% लागून विद्यालयाने यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे.

परीक्षेस एकूण 74 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 71 विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत.

आकांक्षा ज्ञानेश्वर रायते हिने 90.20% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशानंतर वेदांत भाऊसाहेब रायते आणि प्रथमेश संतोष घोडेकर या दोघांनी समान म्हणजेच 88.80% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर सिद्धी विठोबा रायते (86.40%) तृतीय क्रमांकावर राहिली.

त्यानंतर तनुजा शरद रायते (83.20%), शिवानी गणेश रायते (83%) आणि सार्थक दत्तात्रय थोरात (83%) या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.

या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सरचिटणीस, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच ग्रामपंचायत खडक माळेगाव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी व स्थानिक ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशामध्ये शाळेतील गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची चिकाटी आणि पालकांचे सहकार्य या तिन्ही घटकांचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्याध्यापकांनी नमूद केलें.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे