महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ते खुले करणे अभियाना अंतर्गत निफाड तहसील कार्यालयात बैठक संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
निफाड दि ०५ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, प्रणिते शरद राव पवळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व शासनाच्या निर्णयाप्रमाणे व जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांचे परिपत्रकाप्रमाणे सुरू असलेल्या शेत रस्ते खुले करणे अभियान अंतर्गत आज दिनांक 4/2/2025 शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच वाजता निफाड तहसील कार्यालय येथे माननीय तहसीलदार विशाल नाईकवाडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार खेडेकर मॅडम पोलीस निरीक्षक बावस्कर साहेब शरद घाडगे साहेब गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांचे प्रतिनिधी उपअधीक्षक भूमी अभिलेख निफाड यांचे प्रतिनिधी सर्व मंडळ अधिकारी साहेब सर्व ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी साहेब व महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ते चळवळ कृती समिती निफाड सदस्य यांचे उपस्थितीत निफाड तहसील कार्यालय येथे बैठक झाली.

त्या बैठकीमध्ये शिव रस्ते पाणंद रस्ते गाव नकाशा वरील रस्ते अभियाना अंतर्गत खुले करण्यासाठी कृती समिती सदस्यांनी विविध मुद्दे मांडले त्यावर तहसीलदार साहेबांनी सकारात्मक चर्चा करून रस्ते खुले करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.

मोजणी करून हद्दीच्या खुणा करून रस्ते खुले करण्यात येतील असे सांगितले इतर विभागांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विभागाची जी रस्ते खुले करण्यासंदर्भात कामे असतील ती लवकरात लवकर केली जातील असे सांगितले.
माननीय तहसीलदार साहेबांनी मी सांगितले की नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या निफाड तालुक्याचे काम सर्वात चांगले चालू आहे.
त्यामुळे आपला निफाड पॅटर्न रस्ते खुले करणे बाबत राज्यभर दिशादर्शक ठरावा असे काम आपणास करावयाचे आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे अशा पद्धतीने बैठक खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.

शेवटी कृती समितीच्या वतीने तहसीलदार साहेबांनी बैठक आयोजित केल्याबद्दल व इतर अधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले व धन्यवाद दिले.



