न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २९ सप्टेंबर दत्तात्रय दरेकर
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील लेझीम पथक, ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान. भास्करराव भगरे सर, जयदत्त होळकर संचालक बाजार समिती मुंबई, अप्पासाहेब हंडाळ पोलीस उपनिरीक्षक लासलगाव, डॉ. सुजित गुंजाळ सदस्य, जनरल बॉडी र.शि.संस्था सातारा, सुनिल मालपाणी सदस्य, र.शि. संस्था उ. वि. सल्लागार समिती अ.नगर, सचिन दरेकर सरपंच ग्रामपंचायत विंचूर, सचिन उषा विलास जोशी शिक्षण अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते नाशिक,स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे,स्थानिक सल्लागार समिती, सदस्य जगदीश जेऊघाले, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर,आदी मान्यवर,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयातील गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत,रयत गीत सादर केले. विद्यालय मार्फत उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे व पाहुण्यांचे विद्यालयामार्फत यथोच्च सत्कार करण्यात आले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक. चांदे आर.के. लाईफ मेंबर र.शि. संस्था सातारा यांनी प्रमुख पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून दिला.
विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन. ई.यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाची स्थापना, विद्यालयाची वाटचाल,विद्यालयात राबवले जाणारे विविध उपक्रम, प्रकल्प, स्पर्धा परीक्षा, इ.10 वी,12 वी, निकाल,विज्ञान, कला, क्रीडा,क्षेत्रातील उल्लेखनीय यश,विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास यासाठी केले जाणारे प्रयत्न, इ. माहिती सादर केली.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन उषा विलास जोशी यांनी भाषणाच्या सुरुवातीस मानवाचा तिसरा डोळा म्हणजे शिक्षण, हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिले व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले शिक्षण संस्थेचा उद्देश कार्य, तसेच उदबोधनात्मक माहिती सादर केली, त्यात हजार चुका करा पण एक चूक हजारदा करायची नाही.
विद्यार्थ्यांनी मिस्टेक बुक तयार करावे, ज्याला यश हवे त्यांनी निर्भय रहावे, नेहमी सकारात्मक विचार करावा, नेहमी प्रामाणिक रहा, असे मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी जयदत्त होळकर यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेती क्षेत्रातील समस्या व समस्यांचे निराकरण याविषयी मार्गदर्शन केले.
खासदार भास्कराव भगरे सरांनी आपल्या भाषणातून कर्मवीरांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्थेचा इतिहास कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न , तसेच एक सामान्य शिक्षक ते लोकसभा सदस्य असा प्रवास वर्णन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी प्रामाणिक राहणे, कामावरील निष्ठा व कठोर मेहनतीने इच्छित ध्येय गाठता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतःचा सुरुवातीपासून ते लोकसभा सदस्य पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच विद्यालयाच्या अपेक्षा जसे अपूर्ण पक्की संरक्षण भिंत, एन.सी.सी. कोर्स सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर इ.10वी व इ.12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथी व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज शुद्ध पाणीपुरवठा करणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री राजाराम गायकवाड यांना प्रमुख अतिथी व पाहुण्यांच्या हस्ते जलदूत पुरस्काराने गौरविण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी आहार शिजवणारे दत्तात्रय व्यवहारे यांचा व सत्कार करण्यात आला.
या जयंती सोहळ्याप्रसंगी सोमनाथ निकम, राजेंद्र गोरे, मीराताई दरेकर, स्नेहलताई साळी, आहेर सर, पंढरीनाथ जेऊघाले, ढवण सर, विनायक जेऊघाले, अशोक दरेकर, मोतीराम दरेकर, आत्माराम दरेकर, भाऊसाहेब संधान, बन्सीलाल नागरे, हरिभाऊ पाटील, नंदकिशोर दरेकर, सुरज भट्टड, दिनकर चव्हाण, पत्रकार किशोर पाटील, तानाजी आंधळे, पत्रकार दत्तात्रय दरेकर, पत्रकार सुनील क्षीरसागर, ज्ञानेश्वर गाडे, अमजद पठाण, बिपिन ब्रम्हेचा, राजाराम दरेकर, सुनिल पुंड, शंकर दरेकर, पत्रकार कादरी डी.बी. पत्रकार जोशी जगन्नाथ, पत्रकार दिपक घायाळ, अरुण थोरे, किशोर जेऊघाले, इस्माईल मोमीन, महेंद्र पुंड, दिपक चव्हाण, शांताराम दरेकर, रणजीत गुंजाळ, ज्ञानेश्वर काकड, सुदाम आव्हाड, बापूसाहेब सोदक, वत्सलाबाई काळे, स्वाती धात्रक, सुमन दरेकर, सोनाली कापडणीस, उर्मिला जगताप, प्रियंका सोनवणे, बागुल सी.जी. खंडूभाऊ कांगणे,ज्ञानेश्वर भाऊ तासकर, सतीश शेलार, मनोज दरेकर, संदीप शिरसाठ, विजय क्षीरसाठ, वाजे गुरुजी, दिलीप निकाळे, शितल खैरे, तेलोरे सर, प्राथ. वि. मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ व विंचूर व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक , ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षिका नागणे बी. आर. व सावळे ए. वाय. त्यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या शेवटी
विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के.जी. यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.