Breaking
महाराष्ट्र

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या जाधव गॅस एजन्सीच्या विरोधात लासलगाव शहर विकास समितीच्या ढोल ताशे बजाव आंदोलनाची तातडीने दखल

लासलगावमध्ये विसाव्या दिवशी गॅस सिलिंडर वितरणाला वेग ; काल सायंकाळी २५० गॅससिलिंडरचे वितरण; आज ५०० सिलिंडर वितरित होणार, उद्यापर्यंत शहरातील एक हजार बुकिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

1 3 1 7 4 6

न्यायभूमी 

लासलगाव दि.२७ ऑक्टोबर कैलास उपाध्ये

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या जाधव गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात लासलगाव शहर विकास समितीने ढोल-ताशे बजाव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेला वेग आला आहे. २२ दिवसाच्या खंडानंतर सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी २५० गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण करण्यात आले असून, आज दिवसभरात आणखी ५०० सिलिंडरचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातील एकूण एक हजार प्रलंबित बुकिंग उद्यापर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती एचपी गॅसच्या जाधव गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर बनभेरू यांनी दिली.

      गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट करूनही घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने लासलगाव शहर व परिसरातील ग्राहकांना सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अनेक ग्राहकांना २० दिवसांपासून सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. या पार्श्वभूमीवर 24 ऑक्टोबर शनिवार रोजी लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने प्रकाश पाटील, राजेंद्र कराड, संदीप उगले, प्रमोद पाटील, धर्मेश जाधव, चंद्रकांत नेटारे, शेखर कुलकर्णी, विकास कोल्हे, बाळासाहेब जगताप, यश भोगे, भूषण वाळेकर, दत्ता कुमावत, दीपक परदेशी, राजू देसरडा, संतोष पवार, अनिल भागवत, महेश बकरे, गणेश जोशी, सचिन शिंदे, अभिजीत जाधव, अनिल भावसार, दीपक कांकरिया, दीपक जोशी, गणेश इंगळे, नामदेवराव शिंदे, विकास खंडजोड, मन्सूर भाई शेख, गोकुळ कहाने, दत्ता पाटील, अश्विन शिंदे, माधव मिस्तरी, रविराज बोराडे, सुरेश कुमावत, विजय बोथरा, विलास निकम, अंकुश पांडे, बबन काळे, रफिक शेख आणि नवनाथ घोटाळे यांच्यासह त्रस्त ग्राहकांनी

ढोल-ताशे बजाव आंदोलन करून गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनानंतर गॅस सिलिंडर वितरणाला गती मिळत असल्याचे चित्र आहे. 

 

• ग्रामीण भागातील वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था

 

लासलगाव शहरासोबतच ग्रामीण भागातील ग्राहकांनाही गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सी.डी.पटणी गॅस एजन्सी, येवला आणि कातकाडे गॅस एजन्सी, मनमाड यांच्याकडे 31 ऑक्टोबर पर्यंत गॅस सिलेंडर वितरण व्यवस्था सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही सिलिंडर वितरणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

 

• नागरिकांनी घाई करू नये; सर्वांना सिलिंडर मिळणार : लासलगाव शहर विकास समितीचे आवाहन

 

गॅस सिलिंडर वितरणाला वेग मिळत असल्याने सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सर्व ग्राहकांना गॅस सिलिंडर घरपोच मिळणार असून वितरण व्यवस्था सुरळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाईगडबड करू नये, अनावश्यक गर्दी करू नये आणि संयम राखावा. प्रलंबित बुकिंगनुसार सर्व ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर उपलब्ध होण्यासाठी जाधव गॅस एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन लासलगाव शहर विकास समितीने केले आहे.

 

• लासलगाव शहर विकास समितीच्या आंदोलनानंतर पुरवठा विभागाने दखल घेऊन संबंधित विभागाला गॅस पुरवठा सुरळीत करून

ग्राहकांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच नोंदणीकृत गॅस टाक्या घरपोच वितरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण होऊन गॅस पुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे नागरिकांनी, ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे.

विशाल नाईकवाडे

तहसिलदार, निफाड 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 7 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे