Breaking
महाराष्ट्र

नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचेच सविस्तर वृत्त 

सौ.अनिता महेश भामरे उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा नाशिक महानगरपालिका

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

नासिक जिल्हा दि.२७ जानेवारी रोशन गव्हाणे 

 

Oplus_131072

   काल दिनांक २६ जानेवारी २०२५ भारतीय प्रजासत्ताक दिनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश  महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडत असतांना व्यासपीठावरील भाषणात संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब यांचे नाव घेण्याचे पालकमी याचे कडून राहून गेले त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्ला सरकारी वनविभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी राग व्यक्त करीत कार्यक्रमात अडथळा आणला.

खरंतर वंदे मातरम,भारत माता की जय,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या जात असतांना बाबासाहेबाची घोषणा दिलीच पाहिजे होती परंतू कधी कधी भाषणाच्या ओघात चुक होते.  

     प्रजासत्ताक दिनी डाॅ बाबासाहेबांचे नाव घेणे प्रत्येकाला अपेक्षित होतेच परंतू झाल्या गोष्टींवर पडदा टाकणेही तेवढेच महत्वाचे.पालकमी गिरीश महाजन याचे बाबतीत सांगायचेच झाले तर आपण एकदा जामनेर गेले पाहिजे.स्वतः लक्ष घालून छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारलो आहेत.

सालाबादाप्रमाणे दरवर्षी १४ एप्रिल रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती स्वतः लक्ष घालून साजरी करत असतात.

 आरोग्यदूत म्हणून उत्तर महाराष्ट्रात अतिशय उत्तम काम चालते.त्या शिबिरात सर्वच जाती धर्माच्या लोकांवर मोफत उपचार केले जातात.अशावेळी तिथे हा अमूक जातीचा म्हणून अन्याय होत नाही.

भाऊंच्या या कार्याची दखल घेता केवळ अनावधानाने डाॅ बाबासाहेब यांचे नाव घेण्याचे राहिले असेल तर आपणही मोठया मनाने त्यांना माफ केले पाहिजे किंबहूना बाबासाहेबांना तेच अपेक्षित राहिले असते.

पालकमंत्री यानी पत्रकारांसमोर देखील दिलगिरी व्यक्त केलीच आहे.

एका चुकीची शिक्षा ॲट्राॅसिटी पर्यंत नेणे कितपत योग्य आहे हे बाबासाहेबांच्या अनुयायांनी ठरवावे.छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हा देश चालणार यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही.

2.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे